
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मुले वाहून गेल्याचे कळताच तातडीने शोधमोही
.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सांगोला तालुक्यातील महिम गाव परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कासारगंगा ओढ्याला नदीचे स्वरूप आले होते आणि पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान होता. ओढ्याच्या प्रवाहात आई सोबत नदीवर कपडे धुवायला गेलेला मुलगा व पुतण्या आईच्या डोळ्यादेखत ओढ्यात वाहून गेले. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुलांना शोधण्यासाठी संपूर्ण गाव ओढ्यावर
घटनेची माहिती मिळताच, संपूर्ण गाव ओढ्याकिनारी जमा झाला. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. काही वेळाने प्रशासनाचाही ताफा घटनास्थळी दाखल झाला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण शोकाकुल झाले होते. प्रशासनाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुलांचा शोध घेण्यासाठी पंढरपूरहून एनडीआरएफच्या टीमची मदत मागवण्यात आली होती. अथक प्रयत्नांनंतर दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, ऐवळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, अलीकडील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ओढे-नाले उफाळून वाहत आहेत. साधारणत: लहानसा वाटणारा कासारगंगा ओढा देखील प्रचंड वेगाने वाहत असल्याने तो नदीसारखा धोकादायक बनला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने पावसाळ्यात ओढे-नाल्यांच्या काठावर जाणे किती धोकादायक ठरू शकते, याचे उदाहरण समोर आले आहे.
हे ही वाचा…
राज्यातील पाऊस थांबताच शेती नुकसानीचे पंचनामे:लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन
राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लवकरच मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीच्या उद्घाटनावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.