
करकंब येथील जळोली चौक ते धाकटी वेस येथील रस्ता हा मुख्य रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचा ज्येष्ठ नागरिक, महिला व शाळकरी मुले व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच याच रस्त्यावरून आषाढी वारीसाठी येणारे लाखो वारकरी व पालख्या भरपूर प्रमाणात येत असतात व रात्रीच्या वेळी अंधारातून यावे-जावे लागत असल्या कारणाने येथे आधुनिक पद्धतीचे पथ दिव्याची अतिशय गरज आहे. करकंबमध्ये या रस्त्यावरून संत निवृत्तीनाथ महाराज पालखी, संत मुक्ताबाई, संत सोपान काका, संत एकनाथ महाराज, संत जनार्दन स्वामी इत्यादी पालख्या याच मार्गाने करकंब गावांमध्ये प्रवेश करून मुक्कामी असतात. या रस्त्यावरती जिल्हा परिषदेची शाळा, हायस्कूल व कॉलेज तसेच भारतीय स्टेट बँक, मुख्य व्यापारी पेठ याच मार्गावर असल्याकारणाने व उंबरे, जळोली, सांगवी- बदलकोट या गावातील नागरिकांना सोलापूरला जाणे येणे साठी याच मार्गावरून जावे लागत असून या रस्त्यावरती दलित वस्ती असून यांनाही या रस्त्याचा लाभ होणार आहे. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याची मागणी होत असल्याचे यावेळी सांगितले. भरीव निधीची तरतूद करा या काँक्रीट रस्त्याच्या व आधुनिक पथ दिव्याच्या कामासाठी आपण शासन दरबारी योग्य तो प्रयत्न करून यासाठी भरीव निधीची तरतूद डीपीडीसी मधून आपल्या स्तरावरती प्रयत्न करावा. उच्चस्तरीय स्वतंत्र बैठक घेऊन स्थानिक लोकांची समस्या समजून घेऊन काँक्रिटीकरणाचा रस्ता व पथ दिवे मंजूर करावे, अशी जनतेतून मागणी होत आहे. या आशयाचे निवेदन करकंब येथील अजितसिंह मित्र परिवाराने रणजितसिंह शिंदे यांना दिले असून या बाबत नक्की पाठपुरावा करु असे आश्वासन शिंदे यांनी दिले असल्याचे अशोक देशमुख यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



