
महायुती सरकारमधील राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा एका सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेघना बोर्डीकर या कार्यक्रमाच्या मंचावरून एका ग्रामसेवकावर थेट संताप व्यक्त क
.
राज्यात मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनाची मालिका सुरूच आहे. आजच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” असे विधान केलेले असतानाच आता बोर्डीकर यांनी अधिकाऱ्याला झापत कानाखाली मारण्याची भाषा वापरल्याने विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी पुन्हा एकदा आयते कोलीत भेटले आहे.
मेघना बोर्डीकर त्या व्हिडिओत काय म्हणाल्या?
जिंतूर तालुक्यातील बोरी गावात नुकत्याच पार पडलेल्या एका अधिकृत कार्यक्रमात हा प्रसंग घडला. आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पोस्ट केला आहे. या व्हिडिओत मेघना बोर्डीकर ग्रामसेवकाला उद्देशून म्हणतात, “असं कुणाचं सालगडी सारखं काम केलं ना, तर याद राख, हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. पगार कोण देते हा? आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख. तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी”
रोहित पवार यांची पोस्ट काय?
सभागृहात रम्मी खेळणारे… पैशांच्या बॅगा भरणारे… डान्सबार चालवणारे… आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे.. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची…
सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?
देवेंद्र फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे.
कृपया यांना आवरा..!
हे ही वाचा…
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय!:संजय शिरसाट यांचे आणखी एक वादग्रस्त विधान, पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. अकोल्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
पुणे MIDC मध्ये दादांची दादागिरी आहे का?:रोहित पवार यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल; नाव जाहीर करण्याचे दिले आव्हान
पुण्याच्या एमआयडीसीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी आहे का? असा खडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे महायुती सरकारच्या घटकपक्षांमधील कथित कुरघोडीचे राजकारण चव्हाट्यावर आले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.