
Meetings Between Jayant Patil and Ajit Pawar: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्यामगे वेगवान राजकीय घडामोडी घडताना दिसू लागल्या आहेत. यादरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी कांग्रेसचे नेतेही आता उघडपणे दोन्ही पक्षांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त करत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाणार होती असे दावेही केले जात आहेत.
जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये झाली होती बैठक
राष्ट्रवादी विलीनीकारणासाठी अनेक बैठका मुंबईत पार पडल्या होत्या अशी सूत्रांची माहिती आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, जयंत पाटील यांच्या निवासस्थानी विलिनीकारणासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात 3 ते 4 बैठका पार पडल्या होत्या. जयंत पाटील यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा 1 नंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच 2 ते 3 बैठका मुंबईत गुप्त ठिकाणी झाल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकांच्या निकालानंतरच विलीनीकरणाची घोषणा करण्याचा निर्णय झाला होता. मात्र काही कारणास्तव घोषणा झाली नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर घोषणा करण्याची चर्चा दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झाली होती अशीही सूत्रांची माहिती आहे.
अजित पवारांनी घेतल्या होत्या 14 बैठका?
सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी अजित पवारांनी 14 निर्णायक बैठका घेतल्या होत्या. दरम्यान, अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची शेवटची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आणण्यावर अंतिम सहमती होती.
पुढे नेमकं काय काय घडलं?
अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या अंतिम बैठकीनंतर अजित पवारांची शरद पवारांशी थेट भेट झाली. जिथं शरद पवारांनीही दोन्ही पक्ष एकत्र येण्यास हिरवा कंदील दाखवला. जिल्हा परिषद निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एकत्रिकरण जाहीर करण्याचा निर्णयही झाला. म्हणूनच उमेदवारांना तुतारीऐवजी घड्याळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदरील संपूर्ण राजकीय प्रक्रियेमध्ये राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात आल्याची माहिती असून, शरद पवारांनी कुटुंबप्रमुख म्हणून एकत्रीकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आणि पक्षाच्या भवितव्यासाठी एकत्र येण्यावर भर दिला.
सुनेत्रा पवार यांच्या नावाला कोणाचा विरोध नाही
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी केलं जाण्याची आणि पक्षाचं अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाला कोणाचा विरोध नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सर्व पवार कुटुंब एकत्र बसून याचा निर्णय घेतील. येत्या दोन दिवसात याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. पक्ष नेतृत्व कोणाकडे द्यावे याबाबतचा निर्णयदेखील होईल.
महायुतीचे घटकपक्ष म्हणून उपमुख्यमंत्री पद आणि पक्षाचे अध्यक्षपद आमच्याकडे आहे त्यासाठी आम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



