digital products downloads

डीजीसीएचा निर्णय: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआरच्या 4 विमानांवर उड्डाणबंदी, या कंपनीच्या विमानाला जानेवारीत झाला होता अपघात

डीजीसीएचा निर्णय:  अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआरच्या 4 विमानांवर उड्डाणबंदी, या कंपनीच्या विमानाला जानेवारीत झाला होता अपघात

  • Marathi News
  • National
  • 4 VSR Aircraft Grounded After Ajit Pawar’s Accidental Death, This Company’s Aircraft Had An Accident In January

नवी दिल्ली55 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

बारामतीजवळ गेल्या महिन्यात व्हीएसआर व्हेंचर्सचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी चौकशी करत असलेल्या डीजीसीएला अनेक त्रुटी आढळल्यानंतर त्यांनी आता व्हीएसआर व्हेंचर्सच्या ४ विमानांची उड्डाणे थांबवली आहेत. या अपघातानंतर व्हीएसआर व्हेंचर्सचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात आले होते.

नॉन-शेड्युल्ड विमानांच्या सुरक्षेत चूक झाल्यास कारवाई

दरम्यान, डीजीसीएने सोमवारी झारखंडमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या पार्श्वभूमीवर आदेश जारी केले आहेत. हे उड्डाण अनौपचारिक श्रेणीतील होते, ज्यात ७ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता विमानन नियामक डीजीसीएने नॉन शेड्यूु्ड विमान चालकांसाठी कडक सुरक्षा नियम लागू केले आहेत. हे असे चालक असतात, ज्यांच्या उड्डाणांचे कोणतेही निश्चित वेळापत्रक किंवा ठरलेला मार्ग नसतो.

डीजीसीएने म्हटले की, भाड्याने घेतलेली विमाने (चार्टर प्लेन) किंवा खासगी हेलिकॉप्टर कंपन्यांमध्ये नियमांचा कोणताही मोठा निष्काळजीपणा आढळला, तर त्यासाठी कंपनीचे मोठे अधिकारी आणि जबाबदार व्यवस्थापकांना वैयक्तिकरिी्या दोषी मानून त्यांच्यावर कारवाई होईल. सुरक्षेतील त्रुटींसाठी फक्त वैमानिकांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. अशा चालकांच्या विमानांचे वय, देखभाल-दुरुस्तीचा इतिहास यासारखी माहितीदेखील सार्वजनिक केली जाईल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp