
जिल्ह्यात सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) ६ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार यंदा एकरी ५ ते ६ क्विंटल कापूस खरेदी करण्याची मर्यादा लागू करण्यात आली आहे. ही मर्यादा मागील वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये एकरी १२
.
सध्या खुल्या बाजारात कापसाचे किमान दर ६१०० ते कमाल दर ६४०० रूपये क्विंटला दर मिळत आहेत. हमीभावापेक्षा हे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर क्विंटलला ७७१० ते ८११० रूपयांच्या हमीभावाने कापूस विक्री करणे फायदेशीर ठरत आहे. परंतू मर्यादित कापूस खरेदीच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही भागात उत्पादन हेक्टरी १८ ते २० क्विंटलपर्यंतही जाते. पण सीसीआय फक्त १३ ते १४ क्विंटलच खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना उर्वरित कापूस कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.राज्यातील हवामान, पाऊस आणि उत्पादन क्षमता यांचा एकत्रित विचार करूनच कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे सीसीआयकडून सांगितले जात आहे.
नोंदणी ८५०६ जणांची,प्रमाणीकरण फक्त २५३
१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधीत ‘कपास किसान” याअॅपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करतायेणार आहे. गुरुवारपर्यंत ८५०६ पेक्षाजास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेलीआहे. परंतु, नांदेड बाजार समितीने२५३ जणांचेच प्रमाणीकरण केले.
शासनाने घटवली मर्यादा
यंदा शासनाने राज्यात कापूसखरेदीची एकरी मर्यादा कमी केली.अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेआहे. त्यामुळे उत्पादनाची क्षमताघटली आहे. त्यामुळे हा निर्णयघेण्यात आला असावा, असे नांदेडकृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवएम. टी. पाटील यांनी सांगितले.
सीसीआयच्या जाचक अटी, ७७१० ते ८११० रुपये हमीभाव
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील सीसीआयच्या केंद्रावर कापूस खरेदीलासुरूवात झाली आहे. मुहूर्ताला ८ हजार ६० रूपये क्विंटलला भाव मिळाला.
बॅनरसमोर फोटो काढणे आवश्यक
ॲपमधील अटी शेतकऱ्यांना जाचक ठरतआहेत. तसेच तांत्रिक गोष्टींचे ज्ञान नसल्यामुळेअडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांनासीसीआयच्या बॅनरसमोर फोटो काढावा लागणारअसून तेव्हाच त्यांचे बिल पास होणार आहे.तसेच शेतकऱ्यांना केंद्रावर हजर राहणेबंधनकारक असणार आहे. तसेच स्लॉट बुकझाल्यानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना येण्यासजमले नाही तर, दोन वेळाच संधी दिली जाईल.त्यानंतर मात्र, संधी नसेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



