digital products downloads

नदीवर पूल नसल्याने तराफ्यातून विद्यार्थ्यांना गाठावी लागते शाळा‎: फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडी येथे 11 किलोमीटरचा फेरा टाळत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड‎ – Chhatrapati Sambhajinagar News

नदीवर पूल नसल्याने तराफ्यातून विद्यार्थ्यांना गाठावी लागते शाळा‎:  फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडी येथे 11 किलोमीटरचा फेरा टाळत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड‎ – Chhatrapati Sambhajinagar News


फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडीत‎गिरिजा नदीवर पूल नसल्याने‎शिक्षणासाठी ११ किमीचा फेरा पडतो.‎त्यामुळे थर्माकोलच्या तराफ्यावर बसून‎दोरीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना‎ नदी पार‎करावी लागते. पूल नसल्याने‎दळणवळणाची व्यवस्थाही ठप्प आहे.‎पालकांसह विद्

.

लहान्याची वाडीवरील ५ वस्तीच्या ‎विद्यार्थ्यांना मुख्य गावात शिक्षणासाठी‎यावे लागते. शाळेत जाण्यासाठी नदी‎ओलांडावी लागते. मात्र अद्याप पूल न‎झाल्याने या मुलांना थर्माकोलच्या‎पाट्यांच्या साहाय्याने तयार केलेल्या ‎तराफ्यातून शाळा गाठावी लागते. त्यामुळे‎ जीव धोक्यात घालून विद्यार्थी ये-जा‎ करतात. रोज जीव मुठीत घेऊन हे विद्यार्थी‎थर्माकोलवर बसून पाण्याच्या प्रवाहातून‎ नदी पार करतात. पावसाळ्यात नदीला पूर‎ आल्यास शाळा बंद ठेवण्याची वेळ ही‎पालकांवर येते. या संदर्भात आम्ही नेहमी‎ प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे, परंतु‎कुठल्याही प्रकारे याची दखल घेण्यात‎आली नाही. शासनाने लवकरात लवकर‎येथे पूल मंजूर करावा. नसता ग्रामस्थांच्या‎वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे‎सरपंच सुधाकर बहुरे यांनी सांगितले.‎

थर्माकोलवर पत्रा बांधून ‎दोन्ही काठांवर बांधली दोर‎

पूल नसल्याने येथील नागरिकांनी‎थर्माकोलवरती पत्रा बांधून नदीच्या‎दोन्ही काठास दोर बांधली आहे. त्या‎दोरीचा आधार घेत थर्माकोलवर बसून‎जलप्रवास करून शालेय विद्यार्थी व‎नागरिक ये-जा करतात. तसेच‎लहान्याची वाडी परिसरातील गिरिजा‎नदीत सिमेंट बंधारा बांधला.‎बंधाऱ्यावरून नागरिकांनी जा-ये केली.‎मात्र, त्या सिमेंट बंधाऱ्यावर पाण्यामुळे‎शेवाळ आल्याने पास घसरतो.‎

पाण्यामुळे शाळेत पाठवत नाही‎

^गिरिजा नदीला पाणी आल्यानंतर अनेक वेळा‎आई-वडील शाळेत पाठवत नाहीत. पाण्याचा प्रवाह‎थोडा कमी झाल्यानंतर थर्माकोलवर बसत माझा‎भाऊ मला गिरिजा नदीतून दुसऱ्या बाजूला सोडतो.‎शाळा सुटल्यानंतर पुन्हा घरी घेऊन येतो. येथे पूल‎झाल्यानंतर आम्हाला वेळेत शाळेत जाता येईल.‎

-तनुजा बनसोडे, विद्यार्थिनी‎

पुढील वर्षापर्यंत पूल बांधणार‎

^फुलंब्री तालुक्यातील लहान्याच्या वाडीत‎गिरिजा नदीवर पूल व्हावा म्हणून मी‎प्रयत्नशील आहे. यासाठी खूप मोठ्या‎निधीची गरज आहे. येथील विद्यार्थी व‎ग्रामस्थांची निराशा होऊ नये. पुढील‎ पावसाळ्यापर्यंत येथे पूल बांधण्यात येईल.‎ -अनुराधा चव्हाण, आमदार‎

नदीला पाणी आल्यानंतर‎तुटतो अर्ध्या गावाचा संपर्क‎

लहान्याची वाडी येथे पहिली ते‎आठवीपर्यंत शाळा आहे, परंतु अर्धे गाव‎एका तीरावर तर अर्धे गाव गिरिजा‎नदीच्या दुसऱ्या तीरावर गिरिजा नदीच्या‎काठावर आहे. लहान्याची वाडी‎गावांतर्गत बहादुरे, बनसोड, आवळी,‎गोगाई, लहाने वस्ती अशा पाच वस्त्या‎आहेत. अर्धे गाव नदीच्या दुसऱ्या बाजूला‎आहे. या भागात दोन हजार लोकसंख्या‎आहे. त्यामुळे नदीला पाणी आल्यानंतर‎अर्ध्या गावाचा संपर्क तुटतो.‎

आतापर्यंत तीन जणांचा पाय घसरून पाण्यात बुडून झाला मृत्यू

येथे पूल‎नसल्याने आतापर्यंत तीन व्यक्तींना पावसाळ्यात आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये‎२०२० मध्ये संगीता करतारे, २०२३ मध्ये अमोल बनसोडे व २०२४ मध्ये गणेश बहादूरे असे जीव‎गमावलेल्या व्यक्तींचे नाव आहे. येथे छोटा सिमेंट बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्यावर‎पावसाळ्यात शेवाळ असते. या बंधाऱ्यावरून पाय घसरून वरील तिघांचा मृत्यू झाला आहे.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp