
नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दोन्ही पदांवर बिनविरोध निवड करून घेतली. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये
.
महापौरपदासाठी भाजपच्या सुजाता पाटील आणि उपमहापौरपदासाठी दशरथ भगत यांची नावे पुढे आली होती. शिवसेना शिंदे गटानेही दोन्ही पदांसाठी नामांकन अर्ज दाखल केले होते. अलीकडील महापालिका निवडणुकीतील चुरस पाहता या निवडीतही थेट लढत होईल, अशी चर्चा रंगली होती. मात्र, निवडणुकीच्या दिवशी परिस्थिती पालटली. शिंदे गटाच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने दोन्ही पदांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
या अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. महायुतीतील अंतर्गत समन्वय आणि स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे यांचा परिणाम या निर्णयावर झाल्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्ष मतदानाची वेळ येण्याआधीच शिंदे गटाने माघार घेतल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला आणि निवडणूक औपचारिक ठरली. परिणामी, सुजाता पाटील या नवी मुंबईच्या महापौरपदी तर दशरथ भगत उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत.
भाजपकडे 65 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत
111 सदस्यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपकडे 65 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत आहे. एका अपक्ष सदस्याच्या पाठिंब्यामुळे हे संख्याबळ 66 वर गेले. या संख्याबळाच्या जोरावर भाजप आधीपासूनच मजबूत स्थितीत होता. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पडद्यामागे प्रभावी रणनीती आखली गेल्याची चर्चा आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नियोजनामुळे हे शक्य झाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. या निकालामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा भाजपकेंद्रित झाल्याचे दिसते.
नाईक कुटुंबाचा प्रभाव असलेला भाग
या विजयामुळे नवी मुंबई महानगरपालिकेवरील सत्ता पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आली आहे. नाईक कुटुंबाचा प्रभाव असलेला हा भाग पुन्हा एकदा भाजपच्या मजबूत किल्ल्याप्रमाणे अधोरेखित झाला. महापालिकेतील निर्णयप्रक्रिया, धोरणात्मक बाबी आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर आता भाजपचा ठसा अधिक स्पष्टपणे उमटणार असल्याचे चित्र आहे. नव्या महापौर सुजाता पाटील या अनुभवी नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. शहरातील स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा आणि प्रशासनाशी असलेला त्यांचा अनुभव आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे. उपमहापौर दशरथ भगत यांच्यासोबत त्यांना महापालिकेतील विविध विभागांचे समन्वय साधत काम करावे लागणार आहे. पायाभूत सुविधांचा विकास, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि सिडकोशी संबंधित भूखंडांचे प्रश्न यांसारख्या विषयांवर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
राज्यातील महापौर निवडीच्या खालील बातम्या देखील वाचा….
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



