digital products downloads

ब्रेकिंग न्यूज: ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार, मंत्री आशिष शेलारांची माहिती

ब्रेकिंग न्यूज:  ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कवर होणार अंत्यसंस्कार, मंत्री आशिष शेलारांची माहिती



ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज दुःखद निधन झाले. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल होते. आशा भोसले यांचे सुपुत्र आनंद भोसले म्हणाले, माझी आई आशा भोसले यांचे निधन झाले आहे. उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत त्या जिथे राहायच्या तिथे त्यांचे दर्शन घ्यावे आणि उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्कला अंतिम संस्कार होणार आहेत. मंत्री आशिष शेलार म्हणाले, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र दुःखाड बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशा ताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशा ताईंचे असणे हेच आपल्या सगळ्यांना वर्षानुवर्ष समाधानाची अनुभूती देत होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि त्यांचा प्रवास, दुःखाला स्वतः कवटाळून आणि दुसऱ्याला सुख देण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांचे संगीत क्षेत्रातल्या कर्तुत्वाने संपूर्ण जगाला वेड लावले होते. आज मेडिकलच्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात हा अंत्यसंस्कार होणार आहे. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp