
जिल्ह्याचे मुख्यालय असलेला भंडारा शहर राष्ट्रीय महामार्गावर वसलेला आहे. येथील राष्ट्रीय महामार्ग सहावरील सिव्हील सर्जनचा बंगला, अशोका हॉटेल, बीटीबी मार्केट ते साई मंदिर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रोजच अ
.
मागील पाच सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग सहावरील रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे या मार्गावर दररोज अपघात घडत आहेत. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय म्हणजे, या रस्त्याच्या डागडुजीकरिता तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवसांपासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी कुठलाही मार्ग काढला नाही.
परिणामी, बीटीबी (महात्मा ज्योतिबा फुले) भाजी मार्केटमध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांना, सामान्य रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना, हजारोंच्या संख्येत बाहेरुन येणारे मजूर, साई मंदिरामध्ये जाणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागतो. धुळीचाही सामना करावा लागतो. तब्बल एक तास रस्ता रोखून धरण्यात आला होता. यावेळी कार्यकारी अभियंत्यांना ताबडतोब काम करण्यास तसेच आधीच्या कंत्राटदाराला निलंबित करण्यास सांगण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
अन्यथा महाआंदोलन – राष्ट्रवादी अजित पवार गट या रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा महाआंदोलन केले जाईल, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दरम्यान, शनिवारी झालेल्या रस्ता रोको आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांनी केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष हेमंत महाकाळकर, बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे, शेखर गभणे, जगदीश निंबातें, रुवी चट्टा, आशु गोडाणे, प्रदीप सुखदेवे, स्वप्निल नशिने, रुपेश खवास, नरेंद्र झंझाड, विकास मदनकर, महेंद्र मेंढे, मंगेश राऊत, मनीष वासनिक, सचिन घनमारे, संजय वरगंटीवार, अतुल मानकर, लोकेश नगरे, रवी राऊत, निकेत क्षीरसागर, गणेश बानेवार, विष्णु कढीखाये, सुनील मोगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरवासी सहभागी झाले होते.

रस्ता तातडीने दुरुस्त करा – खासदार पडोळे केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता असतानाही भंडारा शहराच्या विकासकामांची आणि रस्त्यांची वाताहत झाली असून, त्यामुळेच भंडारावासियांसह जिल्हा मुख्यालयी येणाऱ्या नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत प़डोळे यांनी केला आहे.
यावेळी बोलताना काँग्रेसचे खासदार म्हणाले की, रस्त्यावर पडलेले खड्डे हे सत्ताधाऱ्यांच्या काळात रस्त्यांच्या झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची साक्ष देत आहेत. रस्त्यांची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे; तर काही रस्ते खचले असल्याचे दिसून येत आहे. संसदीय अधिवेशन संपल्यानंतर भंडाऱ्याला गुरुवारी रात्री आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था बघून जिल्हाधिकारी, भंडारा, सा. बां. विभागाचे अधिकारी यांना याची माहिती दिली व लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करण्याची मागणी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.