
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केंद्रातील सत्ताधारी भाजप व विरोधी बाकावरर थेट राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला. सत्ताधारी भाजप व काँग्रेस केवळ बौद्ध विरोधीच नाहीत, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रविरोधीही आहेत,
.
प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मौर्य साम्राज्याचे महान बौद्ध सम्राट अशोक यांनी सिंहांचा अशोक स्तंभ बांधला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशोक स्तंभ हेच भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. बाबासाहेबांनी अशोक स्तंभाला राष्ट्रीय प्रतीक व राष्ट्रध्वजावरील गडद निळ्या रंगातील अशोक चक्राला स्वीकारण्यात मोठी भूमिका बजावली. हे दोन्ही प्रतीक बुद्धांची शिकवण व धम्माचे प्रतीक आहेत.
राष्ट्रध्वजावरील तदर्थ समितीचे सदस्य म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नंतर स्पष्ट केले की, ‘भारतात बौद्ध धर्म जवळजवळ नामशेष झाला असला तरी, त्याने ब्राह्मण संस्कृतीपेक्षा खूपच श्रेष्ठ आणि समृद्ध संस्कृती निर्माण केली. त्यामुळे संविधान सभेत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रीय चिन्हाचा प्रश्न विचारात घेतला जात होता, तेव्हा आम्हाला ब्राह्मण संस्कृतीतून कोणतेही योग्य चिन्ह सापडले नाही. शेवटी, बौद्ध संस्कृती आमच्या मदतीला आली आणि आम्ही विधि चक्र (धम्म-चक्र) राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले.’
ते पुढे म्हणाले, भारतीय चलनी नोटांवर छापण्यासाठी स्वतंत्र भारताची चिन्हे निवडली जाणार होती. सुरुवातीला असे वाटले होते की, राजाच्या फोटोच्या जागी महात्मा गांधींचा फोटो वापरावे. या संदर्भात डिझाइन तयार करण्यात आले होते. परंतु भारतीय चलनी नोटांवरील गांधीजींचा चेहरा वापरण्यास मनाई करण्यात आली. त्याऐवजी अशोक स्तंभाची निवडण्यात आली.
महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा 1969 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चलनी नोटेवर छापण्यात आला. 1987 मध्ये तत्कालीन राजीव गांधी सरकारने 500 रुपयांच्या नव्याने छापलेल्या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो पुन्हा छापला. त्यानंतर 1996 मध्ये आरबीआयने महात्मा गांधी मालिका सुरू केली, त्यानंतर त्यांचा चेहरा कायम सर्व भारतीय नोटांवर छापण्यात आला.
आज 2025 मध्ये, भाजपने पहिल्यांदा सरकारी जाहिरातींमधून अशोक स्तंभ काढून टाकला. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळातून अशोक चक्र काढून टाकले आणि आता छत्रपती संभाजीनगर वआ कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल्या पोस्टर्समध्ये अशोक स्तंभाच्या जागी “सेंगोल” दाखवण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचा कडाडून विरोध केला. त्यानतंर सेंगोलचे पोस्टर्स हटवण्यात आले.
एक लक्षात घ्या, काँग्रेसने काम सुरू केले व भाजप त्याला पुढे नेण्याचे काम करत आहे. भाजप व काँग्रेसने केवळ बुद्धांच्या शिकवण व धम्माचे प्रतीकच हटवले नाही, तर बाबासाहेबांनी भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलेले प्रतीक हटवले आहेत. त्यामुळे आम्ही भाजप व काँग्रेस केवळ बौद्ध विरोधीच नाही तर ते बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रविरोधीही असल्याचा आरोप करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.