digital products downloads

मतदार यादी दुरुस्ती कामात निष्काळजीपणा भोवला: हिंगोलीत 8 शिक्षकांवर गुन्हा दाखल, वारंवार सूचना देऊनही कर्तव्यात कसूर – Hingoli News

मतदार यादी दुरुस्ती कामात निष्काळजीपणा भोवला:  हिंगोलीत 8 शिक्षकांवर गुन्हा दाखल, वारंवार सूचना देऊनही कर्तव्यात कसूर – Hingoli News


हिंगोली तालुक्यांमध्ये मतदार यादी दुरुस्ती तसेच एसआयआर अंतर्गत कामाच्या पूर्वतयारी मध्ये वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या आठ शिक्षकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यामध्ये तारीख 29 ऑक्टोबर 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये मतदार यादीची दुरुस्ती तसेच एस आय आर अंतर्गत पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तालुक्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यासाठी आयोजित बैठकांसाठी तसेच कामासाठी शिक्षकांना तहसील कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र यापैकी आठ शिक्षक गैरहजर राहिले होते.

या प्रकारामुळे तहसील कार्यालयाने आठ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती तसेच त्यांना तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्यात आला होता मात्र त्यानंतरही शिक्षक उपस्थित झालेच नाही.

याप्रकरणी नायब तहसीलदार मंगला मोरे यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कनेरगाव नाका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रघुनाथ भारती, नरसी प्राथमिक शाळेचे शिक्षक नागेश जाधव, विठ्ठल कामखेडे, भारत प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक शिवाजी राठोड, संभाजी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रल्हाद कोटकर, धानापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पांडुरंग हाळसे, खानापूरच्या विद्यासागर विद्यालयाचे शिक्षक सतीश तायडे, बळसोंड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सतीश नवले या शिक्षकांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार पोटे, अशोक धामणे संजय मार्केट पुढील तपास करीत आहेत.

हे ही वाचा…

चोरट्यांनी लुटलेला मुद्देमाल वीस दिवसांत परत:सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, जिल्हा पोलिस दलाची मानले आभार

कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात चोरट्यांनी तीस लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याने सराफा व्यापाऱ्याचे दुकानाच बंद झाले. मात्र हिंगोली पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात तपास करून सराफा व्यापाऱ्याचे दागिने शनिवारी तारीख 28 परत दिले. दागिने परत मिळताच सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी सेनगाव पोलिसांसह जिल्हा पोलिस दलाचे आभार व्यक्त केले. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial