
Bhaskar Jadhav Statement Controversy: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी स्थानिक ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला आहे. यानंतर गुहागर तालुका ब्राह्मण सहाय्यक संघाने भास्कर जाधवांच्या वक्तव्याविरोधात पत्र काढलं आहे. भास्कर जाधव स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी गुहागर तालुक्यातील ऐक्याला बाधा आणत असल्याचा आरोप ब्राह्मण समाजाने केला आहे. तसंच भास्कर जाधव यांनी राजकीय प्रवासात ब्राह्मण समाजातील अनेक उंबरठे आणि ओट्या झिजवल्याची आठवण ब्राम्हण समाजाने पत्राद्वारे करून दिली आहे. यानंतर भास्कर जाधव यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून आपण माफी मागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
भास्कर जाधव यांनी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवत ‘भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेव्हढा त्रास, कितीबी समोर येवद्या, त्यांला एकटा बास’ अशा शब्दांत पत्राला उत्तर दिलं आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका मांडली. “काल माझी मुंबईत बैठक झाली, ही माझी नेहमीची कार्यपद्धत आहे. ब्राह्मण समाजाने दिलेल्या पत्राचा मी उल्लेख केला. मी का माफी मागावी? मी कुठेही समाजाचा उल्लेख केला नाही, मी त्यांचा अपमान केला नाही,” असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
‘मराठा समाजाला काय मान सन्मान नाही का?’
“तुम्ही समाज नाही तर पक्ष म्हणून पत्र द्यायला हवं होतं. हे ब्राह्मण सहायक समाजाचे लोक गैरसमज पसरवत आहेत. माझी सभा पक्षीय होती, समाज म्हणून नव्हती. मी मराठा समजात जन्माला आलो आहे. माझ्या समाजाचा काय स्वाभिमान नाही? मराठा समाजाला काय मान सन्मान नाही का? अन्य समाजाला नाही का? द्वेष आपण पसरवाचा आणि दुसऱ्यावर खापर फोडायचं हे दिवस आता संपले आहेत. म्हणून द्वेष पसरवण्याचं काम गुहागर तालुक्यातील ब्राह्मण समाजाने पत्र देऊन केलं आहे. ब्राह्मण समाज भाजपाचे बहुसंख्य आहेत असं मी म्हणालो होतो. माझा रोख गुहागरमधील बहुसंख्य ब्राम्हण समाजावरच होता,” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं आहे.
‘ब्राम्हण सहायक संघाने पत्र देण्याचं कारण काय?’
“राजकीय वादात ब्राम्हण सहायक संघाने पत्र देण्याचं कारण काय? राजकारणाला राजकारणाने उत्तर द्यायचं. माझ्या आईबद्दल, वडिलांबद्दल, कुटुंबाबद्दल निलेश राणे किती घाणेरड्या शब्दात बोलला. ती भाषा कोणााही शोभणार नाही. ही भाजपा सभ्य, सुसंस्कृत पार्टी आहे ना, तुम्ही लोकांना ज्ञान शिकवता, सभ्यतेच्या गोष्टी शिकवता. आणि मागे नरेंद्र मोदींचा फोटो लावून माझ्या मृत आईवरुन भाषा वापरता आणि विनय नातू, ब्राह्मण समाजाचे काही लोक तेव्हा दुसऱ्या आई बहिणीचा उद्धार करण्याचा ब्राह्मणांना कोणी अधिकार दिला आहे का? हा वाद तुम्ही आणला आहे. मी कधीही निषेध केला नसून, पत्र दिलेलं नाही,” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
‘भाजपाचं हे षडयंत्र’
“मी काय सगळ्या ब्राम्हण समाजाच्या विरोधात नाही. पुन्हा निवडून येणं न येणे यांच्या हातात आहे का? हे कोण? मी 4 वेळा निवडून आला आहे. तुम्ही कोण ठरवणारे, लोक ठरवतील ना? मी कोणत्याही समाजाबद्दल बोललो नाही, भाजपाचं हे षडयंत्र आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.
सोमवारी त्यांनी सांगितलं होतं की, “माझ्या मागच्या भाषणात मी ब्राह्मण समाजाचा कुठं उल्लेख केला? मी प्रयोग सुद्धा केला नाही, ती राजकीय सभा होती. माझ्या समोर बसलेले जवळजवळ 90 टक्के कुणबी समाजाचे आहेत. पक्षाच्या व्यासपिठावरून चारदोन लोकांचे नाव घेतली तर माझ्या विरोधात त्यांनी पत्र काढलं त्याला मी पत्र लिहलं मला इशारा दिलाय कि ब्राह्मण समाज जागा झाला तर भास्करराव तुम्हाला जड जाईल, बाकीचा समाज थंड झाला आणि तुम्हीच जागे होणार आहात, प्रत्येक गोष्टीला जातीचा रंग द्यायचा, मित्रानो सावध राहा”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.