
अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने ‘मराठी गजल’ अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी स्थानिक साहित्यिकांनी केली आहे. सदर निवेदनावर कवि विष्णू सोळंके यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक सुरेश अकोटकर, अरुण सांगोळे
.
या संदर्भात कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये या मागणीवर जोर देण्यात आला आहे. कुलगुरुंच्या अनुपस्थितीत त्यांचे स्वीय सहायक आर. एम. जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. सुरेश भट यांनी तहहयात साहित्याची विशेषत: कविता-गजलांची सेवा केली. त्यांच्या गजलेवर अनेकांनी शोधप्रबंध सादर करुन या साहित्याला अधिक समृद्ध केले आहे. त्यामुळे हा विषय मराठी भाषेच्या शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी स्वतंत्र अध्यासन उघडले जावे, असे संबंधित निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष असे की सुरेश भट यांचे जन्मगाव अमरावती आहे. त्यांनी मराठी गजलेला वेगळाच आयाम दिला. त्यांच्यानंतर आजही राज्यात चारशेहून अधिक साहित्यिक मराठी गजलेचा प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यामुळे भट यांच्या जन्मगावीच्या विद्यापीठात या विषयाचे स्वतंत्र अध्यासन असणे अधिक प्रासंगिक ठरते, असेही या साहित्यिकांचे म्हणणे आहे.
निवेदन सादर करतेवेळी ज्येष्ठ नागरिक सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुरेशपंत नांदुरकर, इतर पदाधिकारी पळसोदकर, अविनाश राजगुरे, सुधीर देशमुख, वसंतराव सराफ आदी मान्यवरही उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.