
सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दोघांची भाषणे संपले की एकत्र आरोळ्या ठोक्या. आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्
.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी हा मोर्चाचा अजेंडा, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे बाळासाहेबांना जमले नाही ते आज घडले. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पाऊस असल्याने जागा मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम इथे करावा लागला. माझ्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीस यांना जमले.
तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात
राज ठाकरे म्हणाले की, मुळ विषय सोडून अनेकांना बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त रस असतो. सायंकाळी आता चर्चा सुरू होतील की कोण कमी हसले, कोण कमी बोलले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही. हिंदीचा प्रश्नच नव्हता अचानक कुठून हा विषय आला. लहान मुलांना हिंदी शिकावी ही जबरदस्ती तुम्ही करत आहात.कुणाला काहीच विचारायचे नाही शिक्षण तज्ञांचे मत विचारात घ्यायचे नाही. केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार.तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात रस्त्यावर आमच्याकडे सत्ता आहे.
फक्त महाराष्ट्रात प्रयोग केला
राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले.मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली.
मुलं काय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाणार आहे का?
राज ठाकरे म्हणाले की, मी त्या दिवशी दादा भुसेंना सांगितले उत्तरेकडील राज्य कोणती तिसरी भाषा आणणार आहेत. त्यांनी तिसरी भाषा आणली पाहिजे. हिंदी भाषीक राज्य हे आर्थिकदृष्या मागस आहेत.हिंदी न बोलणारी राज्य आर्थिकदृष्टीने प्रगत आहे, यावरही आम्ही हिंदी शिकायचे. यांना हिंदीतून राज्य संभाळता आली नाही त्यांचा विकास करता आला नाही. हिंदी न बोलणाऱ्या राज्यात हिंदी बोलणाऱ्या राज्यातून लोक कामासाठी येत आहे. हिंदी कुणासाठी शिकायचे मुलं काय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जाणार आहे का? हिंदी भाषेबद्दल मला कधीच वाईट वाटत नाही. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते. एक लिपी उभी करण्यासाठी खूप ताकद लागते. भाषा अशीच उभी राहत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.