digital products downloads

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर: दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका – Mumbai News

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर:  दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका – Mumbai News



मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये काही महिला आणि अल्पवयीनांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दंगल 5 एप्रिलच्या रात्री संतोष नगरमध्ये देवी मरियम्मा पूजेसाठी निघालेल्या त्रिशूल यात्रेदरम्यान घडली होती. लाउडस्पीकरवर भजन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दंगल भडकवणाऱ्या शेख कुटुंबाचा ड्रग्सच्या अवैध व्यापाराशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता तेथून ड्रग्सचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, हे कुटुंब बराच काळ परिसरात दहशत निर्माण करत होते. त्यांनी बेकायदेशीरपणे तीन मजली इमारत उभारून त्यावर मोबाईल टॉवरही बसवला होता. दंगलीनंतर महानगरपालिकेने या अवैध बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. 24 तासांचा कालावधी देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गुरुवारी प्रशासनाने थेट कारवाई करत बुलडोजरच्या सहाय्याने हे बांधकाम पाडले. या मोहिमेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईदरम्यान प्रमुख आरोपी सोहेल शेख, शब्बू शेख, फिरोज शेख आणि मुनीर शेख यांच्यासह एकूण 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. मात्र काही स्थानिकांनी आरोप केला की, मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी काही निरपराधांवरही कारवाई केली. या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत. दंगल, अवैध बांधकाम आणि ड्रग्स तस्करी या सर्व बाबींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp