digital products downloads

महाराष्ट्रातील ‘या’ दोन गुजराती आमदारांकडे अफाट संपत्ती! महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची संपत्ती एकत्र केली तरी यांची बराबरी होणार नाही

महाराष्ट्रातील ‘या’ दोन गुजराती आमदारांकडे अफाट संपत्ती! महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची संपत्ती एकत्र केली तरी यांची बराबरी होणार नाही

Maharashtra Richest MLA :  उपमुख्यमंत्री एकनाथ यांनी पुण्यातील गुजराती समुदायाच्या कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी ही अशी जय गुजरात ही घोषणा दिली.. एकनाथ शिंदेंच्या या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर  महराष्ट्रातील गुजराती आमदार देखील चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रातील  दोन गुजराती आमदारांकडे अफाट संपत्ती आहे.  महाराष्ट्रातील सर्व  288 आमदारांची संपत्ती एकत्र केली तरी यांची बराबरी होणार नाही. कोण आहेत हे महाराष्ट्रातील दोन गुजराती धन कुबेर आमदार.

महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून 288 आमदार आपआपल्या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. निवडणुकीचा अर्ज दाखल करताना आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. या प्रतिज्ञापत्रात आमदारांना आपली संपत्ती तसेच उत्पन्नाचा स्त्रोत काय माहिती निवडणूक आयोगासमोर जाहीर करावी लागते. या प्रतिज्ञापत्रातील माहितीवरुन महाराष्ट्रातील दोन श्रीमंत आमदारांची माहिती समोर आली आहे. पराग शहा (Parag Shah) आणि  मंगलप्रभात लोढा हे दोन गुजराती आमदार हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत.   मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) हे मुंबईतील  मलबार हिलचे आमदार आहेत.  मंगलप्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत.

मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सध्या 436  कोटी 80  लाख 48 हजार 591 रुपयांची संपत्ती आहे. लोढा यांच्यावर 182 कोटींचे तर त्यांची पत्नी मंजुळा लोढा यांच्यावर 123.28  कोटी रुपयांचे कर्ज आहे. लोढा यांच्या नावावर एकूण 123  कोटी 38 लाख 98 हजार 588 रुपये इतकी संपत्ती आहे. तसेच  पत्नीच्या नावावर 10 कोटी 28 लाख 75 हजार 340 रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्याकडे 125 कोटी 54 लाख 49 हजार 707 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

दुसरे श्रीमंत आमदार आहेत ते  पराग शहा (Parag Shah). भाजपचे आमदार असलेले पराग शाह हे फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. पराग शाह यांच्याकडे 3,315 कोटींची जंगम आणि 67  कोटींची अचल मालमत्ता आहे.  स्वतःच्या नावावर 2,179  कोटी तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 1,136  कोटींची संपत्ती आहे.  

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp