digital products downloads

मुंबईत पोर्तुगीज महिला कंटेंट क्रिएटरशी छेड: वारंवार नकार देऊनही सेल्फीसाठी पाठलाग, दोन विकृतांविरुद्ध गुन्हा दाखल – Mumbai News

मुंबईत पोर्तुगीज महिला कंटेंट क्रिएटरशी छेड:  वारंवार नकार देऊनही सेल्फीसाठी पाठलाग, दोन विकृतांविरुद्ध गुन्हा दाखल – Mumbai News



देशाची आर्थिक राजधानी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईत एका परदेशी महिला पर्यटकाची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत भ्रमंतीवर आलेल्या आयनस फारिया या पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर महिलेचा दोन तरुणांनी सेल्फीसाठी जबरदस्ती करत पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी स्वतःहून दखल घेत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी रोजीची आहे. आयनस फारिया ही दोन महिन्यांपासून भारत फिरण्यासाठी आली आहे. ती नुकतीच मुंबईतील प्रसिद्ध धोबीघाट परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोन तरुणांनी तिला गाठले. “प्लीज, एक सेल्फी… दोन सेकंदही लागणार नाहीत,” असे म्हणत हे तरुण तिच्याकडे सेल्फीसाठी वारंवार हट्ट धरू लागले. आयनसने अनेकवेळा स्पष्ट नकार देऊनही हे तरुण तिचा पाठलाग करत राहिले आणि तिला अस्वस्थ केले. हा संपूर्ण प्रकार आयनसच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात ती या तरुणांना टाळण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहे. भारतातला अनुभव सुंदर, पण… मुंबईत घडलेल्या प्रकारावर आयनस फारिया हिने नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “मी गेल्या दोन महिन्यांपासून भारतात आहे आणि माझा आतापर्यंतचा अनुभव अतिशय सुंदर आहे. मात्र, माझ्यासोबत असा प्रकार पहिल्यांदाच घडला. मी नकार देऊनही ते तरुण सुमारे १५ मिनिटांहून अधिक वेळ आमचा पाठलाग करत होते. त्यामुळे परिस्थिती अधिकच त्रासदायक व तणावपूर्ण वाटू लागली. एका क्षणी तर मला स्वतःला थोडी जागा मिळावी म्हणून त्यांना दूर ठेवावे लागले.” पोलिसांकडून गुन्हा दाखल व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत आयनसशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. पोलिसांनी तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मिळवून तिला सहकार्य करण्याचे आवाहन केले. आयनसने दिलेल्या माहितीच्या आधारे आग्रीपाडा पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या दोन अज्ञात तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार (पूर्वीचे कलम ७८(१) ३(५)) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू व्हिडिओमध्ये संशयित आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असून आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी संबंधित आरोपींचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे. भरवस्तीत पोर्तुगीज महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp