
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या 5 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. आता या लॉटरीला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 9 ऑक्टोबर रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेंतर्गंत उभारण्यात आलेल्या 5 हजार 285 सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला 12 सप्टेंबरपर्यंत दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनामत रकमेसह प्राप्त पात्र अर्जाची सोडत आता 9 ऑक्टोबरला ठाण्यायातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढण्यात येईल, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
असे असेल वेळापत्रक
28 ऑगस्टच्या दुपारी 4 वाजेपर्यंत 1,49,948 अर्ज प्राप्त झाले असून, अनामत रकमेसह 1,16,583 अर्ज प्राप्त झाले आहेत. नवीन वेळापत्रकानुसार 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. 13 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल.
15 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अर्जदारांना बँकेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दि. 24 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदविता येतील. पात्र अर्जदारांची अंतिम यादी दि. 7 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. 9 ऑक्टोबर रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे लॉटरी काढली जाईल.
FAQ
1. म्हाडा लॉटरी 2025 म्हणजे काय?
म्हाडा लॉटरी 2025 ही महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) च्या कोकण मंडळातर्फे आयोजित केलेली एक गृहनिर्माण योजना आहे. यामध्ये ठाणे, वसई, कुळगाव-बदलापूर आणि सिंधुदुर्ग येथील 5,285 सदनिका आणि 77 भूखंडांचा समावेश आहे.
2. या लॉटरीसाठी किती सदनिका आणि भूखंड उपलब्ध आहेत?
सदनिका: 5,285 (ठाणे, वसई, कुळगाव, बदलापूर येथे) 20%
समावेशक गृहनिर्माण योजनेत: 565 सदनिका
15% एकात्मिक शहरी गृहनिर्माण योजनेत: 3,002 सदनिका
कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेत: 1,677 सदनिका
कोकण मंडळ परवडणारी गृहनिर्माण योजना (50% परवडणारी):51 सदनिका
भूखंड: 77 (ओरोस-सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर)
3. लॉटरीसाठी अर्ज नोंदणीची अंतिम तारीख काय आहे?
ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि भरण्यासाठी अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 पर्यंत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.