
Maharashtra Weather : यंदा पावसाचा भारतासह राज्यात लांबलेला आहे. वेळेत दाखलेला मान्सून ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असली तरी परताना दिसत नाही. नवरात्रसह दसरा पावसात गेल्यामुळे आता दिवाळीचा शण पावसात जाणार का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मराठवाड्यासह सोलापूरमध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडा आणि सोलापुरात शेतकऱ्यांचा शेती पाण्यात तर असंख्य लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशात मान्सून परतीच्या प्रवासा कधी सुरुवात करणार याबद्दल हवामान विभागाने महत्त्वाची अपडेट दिली आहे.
दिवाळी पावसात जाणार का?
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी राज्यातून मान्सून माघारी कधी सुरु करणार याबद्दल सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, गुजरातमध्ये परतीचा पाऊस कोसळत असून तो मुंबईसह महाराष्ट्रात 6 ते 8 ऑक्टोबरदरम्यान बरसणार आहे. याचा अर्थ येत्या सोमवारी 6 ऑक्टोबरला पावसाचा परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या दिवसांमध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 12 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार जाणार असून दिवाळी पावसाशिवाय साजरी करता येणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा शक्यता आहे. तर इतर भागात पावसाची उघडीप राहणार आहे.
शक्ती वादळाचा मुंबईला धोका?
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालाचा पाहिला मिळाला आहे. अधूनमधून हलक्या सरी येत आहेत. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचा ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं आहे. अंदाजानुसार, मध्य भारत आणि महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यामुळे ‘शक्ती’ चक्रीवादळ निर्माण झालं आहे. मुंबईपासून 800 सागरी मैलांवर गुजरातपासून पश्चिम-दक्षिण दिशेला हे वादळ असून 7 ऑक्टोबरपर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकणार आहे, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. मात्र, तोवर त्याचा जोर कमी होईल असही सांगण्यात आलं आहे. मुंबईला या वादळाचा धोका नसल्याचं हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे.
FAQ
1: गुजरातमधील परतीचा पाऊस महाराष्ट्रात कधी बरसणार?
उत्तर: गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात बरसणार आहे. राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2: महाराष्ट्रातून मान्सून कधी पूर्ण माघार घेईल?
उत्तर: १२ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातून मान्सून पूर्णपणे माघार घेईल. त्यापूर्वी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढील तीन दिवस काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
3: कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे?
उत्तर: पुढील कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. इतर भागात पावसाची उघडीप राहील. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत, पण मुसळधार पावसाची शक्यता नाही.
4: ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार काय अंदाज आहे?
उत्तर: ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.