
Ajit Pawar : बारामतीमध्ये जर कुणी कायदा सुव्यवस्था राखणार नसेल तर त्याला योग्य तो धडा शिकवा, बारामतीची बदनामी आजिबात खपवून घेणार नाही असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय. यूपी-बिहारमधून कुणीतरी येतो, आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करतो, ती मुलगीही यूपीचीच असते. यातून शेवटी बारामतीची बदनामी होते, असल्यांचा कायमचा बंदोबस्त करा असे निर्देश अजित पवारांनी पोलिसांना दिले आहेत. (Ajit Pawar gets angry after the rape of an 8 year old girl in Baramati pune crime news in marathi)
अजित पवार काय म्हणालेत?
बारामतीत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून तीन हत्ती चौकात 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहेत. यावेळी केलेल्या भाषणामध्ये अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी बारामतीत 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, या घटनेसंदर्भात अजित पवार संतापलेत. ते म्हणाले की, आठ वर्षाच्या मुलीवर ती पण यूपीचीच, तिच्यावर एकाने बलात्कार केला. शेवटी बारामतीची बदनामी होणार. असल्याना सोडू नका, त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.”
‘लाईनच काढतो अन् टायर खाली…’
बारामतीतील टवाळक्या करणाऱ्या तरुणांना दम देत अजित पवार पुढे म्हणालेत की, कुणी कुठेतरी लाईन मारायला जाल तर तुझी लाईनच काढतो अन् टायर खाली घेतो. कुणालाही अजिबात कोणाला सोडणार नाही. कायदा हातात घेऊ नका. बाबासाहेबांनी संविधान आणि कायदा समाजाच्या भल्यासाठी दिला आहे.”
नराधमांना इशारा देत अजित पवार यांनी जनतेला आवाहन केलं आहे, ते म्हणालेत की, रात्री अपरात्री कुठे काही वेडंवाकड करू नका, चुकीचं वागू नका. कुठेही पचापच थुंकू नका, घाण टाकू नका, व्यवस्थित रहा. आणखीन बारामती हिरवीगार करू, त्याला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.
FAQ
1. अजित पवार यांनी बारामतीत कोणत्या कार्यक्रमात भाषण केलं?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बारामतीतील तीन हत्ती चौकात 30 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात भाषण केलं.
2. अजित पवार यांनी कोणत्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला?
बारामतीत अलीकडेच घडलेल्या 8 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेबद्दल अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
3. बलात्काराच्या घटनेसंदर्भात अजित पवार यांचं काय म्हणणं आहे?
अजित पवार म्हणाले की, 8 वर्षाच्या मुलीवर (तीही यूपीची) बलात्कार झाला, यामुळे बारामतीची बदनामी होत आहे. अशा नराधमांचा कायमचा बंदोबस्त करा, असा निर्देश त्यांनी पोलिसांना दिला.
4. अजित पवार यांनी टवाळक्या करणाऱ्या तरुणांना काय इशारा दिला?
त्यांनी सांगितलं की, जर कुणी टवाळकी किंवा चुकीचं वर्तन केलं तर “तुझी लाईनच काढतो आणि टायर खाली घेतो.” कोणालाही सोडलं जाणार नाही, असा दम त्यांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.