
प्रतिनिधी | वडीगोद्री बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या धावत्या कारला आग लागली. या आगीत कारचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कार उभी करताच तत्काळ चार जण बाहेर पडले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही घटना धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री येथे शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. बीड येथील चार जण खरेदीसाठी छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. महामार्गावरील हरिओम हॉटेलसमोर वडीगोद्री पुलावर त्यांच्या कारमधून धूर निघत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कार साइडला थांबवली. ते खाली उतरून पाहू लागले. तेव्हा धूर आणखीनच वाढला. त्यामुळे त्यांनी गाडीतील साहित्य खाली उतरवले. चौघेही बाहेर पडले. गाडीला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगर परिषद अंबडच्या अग्निशमन दलाने टीमसह येऊन आग विझविली. घटनास्थळी महामार्ग पोलिस उपनिरीक्षक शिवाजी साळुंके, सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव मिसाळ, गोपाल ठोंबरे आदींनी भेट दिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



