
Maharashtra Weather Update: राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने नागरिकांची चिंता वाढवली होती. मात्र आता हळूहळू थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यातील बहुसंख्य शहरात तापमानाचा पारा घसरतोय. विकेंडला नागरिकांना थंडीचा सुखद अनुभव घेता येणार आहे. सोमवारपर्यंत गारठा टिकून राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे. राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात किमान तापमान 11 अंशाच्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याने कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. राज्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे. किमान तापमानाचा पारा 10 अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे असे समजले जाते.
मुंबईचे शुक्रवारी किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. शनिवार, रविवार आणि सोमवारी हा पारा 16 ते 17 अंशांवर उतरण्याची शक्यता आहे. यामुळे गारेगार झालेल्या मुंबईकरांना बोचरी थंडी अनुभवता येणार आहे. मुंबई शेजारचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानचे किमान तापमान 18 नोंदविण्यात आले.
14 ते 20 नोव्हेंबर आणि 21 ते 27 नोव्हेंबर या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
FAQ
प्रश्न १: राज्यात थंडी का वाढू लागली आहे?
उत्तर: उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे झेपावत असल्याने राज्यात थंडी वाढू लागली आहे.
प्रश्न २: सध्या राज्यातील तापमानाची स्थिती काय आहे?
उत्तर: राज्यातील बहुसंख्य शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरू लागला आहे आणि थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे.
प्रश्न ३: थंडीची लाट येण्याची शक्यता कोणत्या भागात आहे?
उत्तर: उत्तर महाराष्ट्रात आलेली थंडीची लाट काही दिवस टिकून राहणार आहे, तसेच राज्यातही गारठा वाढणार असून अनेक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



