
मुंबई56 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अभिनेत्री स्वरा भास्करने इतिहास व महाकुंभाविषयी केलेल्याआपल्या एका ट्विटवर खेद व्यक्त केला आहे. माझ्या ट्विटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याविषयी मी खंत व्यक्त करते. मला माझ्या माझ्या इतिहासाचा इतरांसारखाच अभिमान आहे इतिहासाने आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि भविष्यात लढण्यासाठी ताकदही दिली पाहिजे, असे तिने म्हटले आहे.
अभिनेता विकी कौशल व अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या छावा चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनी या चित्रपटाची दखल घेतली आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने याविषयी एक ट्विट केले होते. त्यात तिने इतिहास व महाकुंभातील चेंगराचेंगरीवर भाष्य केले होते. एका सुशोभित व काल्पनिक चित्रपटात 500 वर्षांपूर्वी हिंदूंवर होणारा अत्याचार पाहून लोक संतापल्याचे दिसत आहेत. पण महाकुंभामध्ये झालेली चेंगराचेंगरी व गैरव्यवस्थापनामुळे झालेले भयंकर मृत्यू पाहून लोक गप्पगार आहेत. हा समाज मेंदू व आत्म्याने मृत झाला आहे, असे स्वरा भास्कर आपल्या ट्विटमध्ये म्हणाली होती.
स्वरा भास्करच्या या ट्विटमुळे मोठा वाद झाला होता. तिच्यावर टीकेची झोड उठली होती. विशेषतः सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे तिने या प्रकरणी एका नव्या ट्विटद्वारे खेद व्यक्त केला आहे. या ट्विटमध्ये तिने छावा चित्रपटाचा उल्लेख केला नाही. पण तिचा रोख त्याकडेच होता हे स्पष्ट होते.

काय म्हणाली स्वरा भास्कर?
माझ्या ट्विटमुळे अनेक वाद व दुर्लक्ष करता येणारे गैरसमज निर्माण झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा व त्यांच्या योगदानाचा मी निःसंशयपणे आदर करते. विशेषतः शिवाजी महाराजांच्या मनात असलेल्या महिलांविषयीचा आदर… इतिहासाचा गौरव करणे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. पण आजचे आपले अपयश लपवण्यासाठी भूतकाळातील वैभवाचा गैरवापर होता कामा नये. ऐतिहासिक समजुतींचा वापर हा कायम लोकांना एकत्र आणण्यासाठी व्हायला हवा. सध्याच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ नये, असे स्वरा भास्कर हिने म्हटले आहे.
माझ्या ट्विटमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याविषयी मी खंत व्यक्त करते. मला माझ्या माझ्या इतिहासाचा इतरांसारखाच अभिमान आहे इतिहासाने आपल्याला एकत्र आणले पाहिजे आणि भविष्यात लढण्यासाठी ताकदही दिली पाहिजे, असेही स्वरा या ट्विटमध्ये म्हणाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited