digital products downloads

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘माझ्याशी दोन वेळा…’

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले ‘माझ्याशी दोन वेळा…’

Devendra Fadnavis on Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या या पदावर सुनेत्रा पवार विराजमान होणार असून, शनिवारी संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे.  सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तयारीसाठी स्वर्गीय अजित पवारांची प्रशासकीय टीम बारामतीहून मुंबईकडे रवाना झाली आहे. सुनेत्रा पवार सकाळी 8 वाजता बारामतीहून स्पेशल हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्याच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही सरकार आणि भाजपा म्हणून उभे राहू. अजित पवारांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल”.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही प्रस्ताव आला का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “माझ्याशी दोन वेळा चर्चा करुन ते गेले आहेत. त्या चर्चेत त्यांनी काय कार्यपद्धती आहे, काय पर्याय आहेत यासंदर्भात चर्चा केली आहे. पण अंतिम निर्णय त्यांचा पक्ष असेल”.

अर्थसंकल्प कोण सादर करणार? या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं की, “अजित पवारांनी अर्थसंकल्पाची भरपूर तयारी केली होती. उद्यापासून मी स्वत: लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर काय ते ठरवू”.

उद्या 5 वाजता सुनेत्रा पवार घेणार शपथ

उद्या म्हणजेच शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या बैठकीला उपस्थित असतील. या बैठकीत सुनेत्रा पवारांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल. यानंतर पक्षाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवडीचे पत्र दिले जाणार आहे. ही निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार आहे. 

‘दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “उद्या दुपारी 2 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. सुनेत्रा पवारांशी आम्ही रात्री संवाद साधणार आहोत. पक्षाचे विधानसभा, विधानपरिषद सदस्य आणि खासदार उपस्थित राहतील. जो निर्णय घेऊ त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवण्यात येईल. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे”. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp