digital products downloads

सुनेत्रा पवार : मैत्रिणीने उलगडले त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व: संगीत, प्रवास आणि कारभारातही सक्षम; जाणून घ्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास – Pune News

सुनेत्रा पवार : मैत्रिणीने उलगडले त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व:  संगीत, प्रवास आणि कारभारातही सक्षम; जाणून घ्या उपमुख्यमंत्र्यांचा प्रवास – Pune News



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे व्यक्तिमत्व अनेक पैलूंनी समृद्ध आहे. त्यांच्या मैत्रिणी अनुराधा प्रभाकर देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सुनेत्राताईंच्या प्रवासावर प्रकाश टाकला. संगीत आणि प्रवासाची आवड असलेल्या सुनेत्राताई प्रशासकीय कारभारातही तितक्याच सक्षम असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सुनेत्राताईंचे वर्णन ‘अष्टावधनी’ या एकाच शब्दात करता येईल, असे अनुराधा देशमुख म्हणाल्या. त्या कार्यक्षम, परिपूर्ण, चाणाक्ष, हुशार आणि कर्तबगार आहेत. त्यांना माहेरकडूनच राजकारणाचे धडे मिळाले असून समाजसेवेची भावना त्यांच्या रक्तातच भिनलेली आहे. सासरी आल्यानंतरही त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. मुंबईत राहत असूनही त्या पुणे, बारामती आणि काटेवाडी येथील घराची दैनंदिन जबाबदारी सांभाळतात. काटेवाडीतील घरी सासूसाठी रोज कोणता स्वयंपाक तयार होतो, कोण आले-गेले, शेती कशी सुरू आहे, याकडे त्या बारकाईने लक्ष देतात. सर्वांना समजून घेणारा स्वभाव अजित पवारांप्रमाणेच त्यांनाही स्वच्छतेची आवड आहे. झाडे, फळे-फुले यात त्यांना विशेष रस असून झाडांची निगा राखण्याकडेही त्यांचे लक्ष असते. सर्वांना समजून घेणारा त्यांचा स्वभाव असल्याने घरातील, कार्यालयातील आणि कंपनीतील अनेक जुने कामगार आजही त्यांच्यासोबत टिकून आहेत. साड्यांची आवड, पण दागिन्यांत फारशी रुची नाही त्यांना शाकाहारी आणि मांसाहारी स्वयंपाक चांगल्या प्रकारे बनवता येतो. त्यांच्या हातचे मांसाहारी जेवण अजित पवारांना खूप आवडायचे. अजित पवारांचेही त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होते. दिल्लीतून घरी येताना ते पत्नीसाठी साडी खरेदी करून आणत असत. सुनेत्राताईंना खादी, कॉटन अशा वेगवेगळ्या साड्या परिधान करण्याची आवड आहे, परंतु सणांना वगळता दागिने घालण्यात त्यांना फारशी रुची नाही. प्रचंड संयमी आणि जबाबदारी सांभाळणाऱ्या नवीन चित्रपट आणि संगीतातील चांगल्या कलाकृतींबद्दल जाणून घेणे त्यांना आवडते. प्रवासात त्या संगीत ऐकणे आणि वाचन करण्यात वेळ घालवतात. अजित पवारांच्या व्यस्ततेमुळे सुनेत्राताईंचे कार्य अनेकदा समोर आले नाही, पण त्या प्रचंड संयमी आणि जबाबदारी सांभाळणाऱ्या आहेत. विद्या प्रतिष्ठान, वैद्यकीय महाविद्यालय, विविध कंपन्या, एआय सेंटर आणि शेती अशा विविध कामांची धुरा त्या समर्थपणे सांभाळतात. आदर्श गृहिणी असण्यासोबतच त्यांचे व्यक्तिमत्व तडफदार आहे. काटेवाडी गावातील महिलांना एकत्र करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आणि गाव आदर्श बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दिलदार व्यक्तीमत्वाचा अनुभव एकदा सुनेत्राताईंनी बारामती मध्ये सर्व मैत्रीणींना योगा क्लासकरिता तीन दिवस बोलवले होते. त्याप्रमाणे आम्ही सर्व मैत्रिणी जमलो होतो. ज्याठिकाणी योगा क्लास होता त्याचजवळ एक रेशीम साडी तयार होणारे ठिकाण होते, त्याबाबत आमच्यात गप्पा झाल्यावर त्याठिकाणी जाण्याचे देखील निश्चित झाले. परंतु आमच्या सर्व मैत्रिणींचे पर्स या घरीच ठेवलेल्या होत्या त्यामुळे आपण नंतर जाऊ असे बोलले तर तात्काळ सुनेत्राताई यांनी त्यांच्या पर्स मध्ये किती पैसे हे काही न पाहताच ती आमच्यासमोर धरली आणि चला आपण जाऊ असे म्हणत पुढकार घेतला ही आठवण कायम लक्षात रहाणारी यातून त्यांचा दिलदारपणा समोर येतो, असा किस्सा अनुराधा देशमुखांनी व्यक्त केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp