
सेनगांव शहरात शहरात विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाला स्पर्श झाल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ता. १९ घडली आहे. धुरपत नागोराव इंगोले असे मयत तरुणाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील रहिवासी असलेला धुरपत इंगोले हा तरुण आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरारासमोर उभा होता. त्याच्या घराजवळ असलेल्या विद्यूत खांबामध्ये विज प्रवाह उतरला होता. मात्र याची त्याला कल्पनाही नव्हती. यावेळी त्याचा खांबाला स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. त्याने मदतीसाठी आरडा ओरड केली मात्र काही क्षणातच तो जमिनीवर कोसळला. सदर प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या भागातील विज पुरवठा खंडीत झाल्यानंतर नागरिकांनी त्याला तातडीने सेनगांवच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण यांनी भेट दिली आहे. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवशी शहरावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत सेनगांव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



