digital products downloads

स्वच्छता कंत्राटात ‘अर्थ’कारण; अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी: अमरावती मनपाच्या विशेष सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर ठपका – Amravati News

स्वच्छता कंत्राटात ‘अर्थ’कारण; अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी:  अमरावती मनपाच्या विशेष सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर ठपका – Amravati News



अमरावती मनपाच्या विशेष आमसभेत नवीन स्वच्छता कंत्राटावरून मोठा गदारोळ झाला. नगरसेवकांनी प्रशासनावर कंत्राट देण्यामध्ये घाई केल्याचा आणि त्यात मोठ्या प्रमाणात ‘अर्थ’कारण झाल्याचा आरोप केला. हा कंत्राट रद्द करून संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरात पसरलेल्या अस्वच्छतेवर उपाययोजना करण्यासाठी शनिवारी ही विशेष आमसभा आयोजित करण्यात आली होती. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी भाजप, राकाँ (अ.प.), वायएसपी तसेच विरोधी काँग्रेस, एमआयएम, शिवसेना या सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावना मांडल्या. तब्बल ३९ सदस्यांनी चर्चेत भाग घेतला आणि सभेचे कामकाज नऊ तासांहून अधिक काळ चालले. स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. गेल्या दीड महिन्यात काही योग्य पावले उचलल्याबद्दल आयुक्त सौम्या शर्मा-चांडक आणि शिल्पा नाईक यांचे कौतुकही करण्यात आले. मात्र, डॉ. अजय जाधव हे सातत्याने टीकेचे धनी ठरले. वायएसपीचे प्रशांत वानखडे यांनी जाधव यांना काहीसा दिलासा देत, स्वच्छतेची जबाबदारी संपूर्ण शहरावर एकट्या त्यांच्यावर न सोपवता कामाची विभागणी करण्याची सूचना केली. माजी महापौर विलास इंगोले, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नाना आमले, प्रशांत वानखडे, स्थायी समितीच्या माजी सभापती राधा कुरील, धीरज हिवसे, स्नेहा लुल्ला, मनीष बजाज, सुरेखा लुंगारे, सुनीता भेले, नसीम खान करीम खान, प्रियंका पाटणे, योगेश विजयकर, मिलींद बांबल, आशिष अतकरे, संजय हिंगासपुरे, लवीना हर्षे, मंगेश मनोहरे, मरियम राराणी, इस्माईल लालूवाले, नुतन भुजाडे, विनोज तानवैस, पंचफुला चव्हाण, सुनीता लोणारे, सय्यद राशद अली, बंडू हिवसे, संजय गव्हाळे, स्वाती कुळकर्णी, महेश मुलचंदानी, रजनी डोंगरे, ॲड. प्रीती रेवणे आदींसह अनेक नगरसेवकांनी अत्यंत मुद्देसूद मांडणी केली. त्यांनी प्रशासनाला आपल्या मुद्द्यांबाबत किती आग्रही आहेत, हे दाखवून दिले. मंचावर उपमहापौर सचिन भेंडे, मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक आणि नगरसचिव संदीप वडुरकर उपस्थित होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp