
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळ लवकरच सेवेत येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विमानतळाची पाहणी केली. नवी मुंबईतील विमानतळाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. विमानतळाची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर काय काय सुविधा असतील आणि खासियत काय असेल याची माहिती दिली आहे. विमानतळासाठी मोठी कनेक्टिव्हीटी तयार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
नवी मुंबई विमानतळ सुरु होण्यासाठी 30 सप्टेंबरचं लक्ष्य ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. नवी मुंबई विमानतळावर मोठी कनेक्टिव्हिटी असेल तसंच, विमानतळावर प्रवाशांना चालावं लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विमानतळावर प्रवाशांना नेण्यासाठी अंडरग्राऊंड ट्रेन धावेल असंही फडणवीसांनी म्हटलंय. नवी मुंबई विमानतळाची भौतिक प्रगती 94 टक्के झाली आहे. बाहेरचे जे सिलिंग आहे त्याचे काम वेगाने करावे लागेल. बॅगेचा बारकोड 360 डिग्री वाचता येऊ शकतो. या एअरपोर्टवरील बॅगेज हे जगातील सर्वात फास्टेज बॅगेल असेल. नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळापेक्षाही मोठं असेल. जेव्हा एअरपोर्ट पूर्ण होईल तेव्हा दोन रनवे या क्षमतेने 9 कोटी प्रवाशांसाठी एअरपोर्ट सुसज्ज होणार आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
नवी मुंबई विमानतळावर येण्यासाठी चारही दिशांनी सुविधा उपलब्ध असणार आहेत. मेट्रो, रेल्वे, वॉटर, ट्रान्सपोर्ट अशी मोठी कनेक्टिव्हीटी केली जाणार आहे. प्रवाशांसाठी महत्त्वाचं एअरपोर्ट असेल. अंडर ग्राउंड मेट्रो असेल कोणालाही पायी चालायला लागणार नाही. अंडरग्राउंड मेट्रो सर्व एअरपोर्टला कनेक्ट असतील. तसेच वाहने घेऊन येण्याची गरजदेखील लागणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
काही विमानतळावर एक किमीपर्यंत पायी चालावं लागतं इथे ट्रॅव्हलर तयार करण्यात आलं आहे. देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट तयार होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचे टार्गेट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही वेळ घेणार आहे. 13 ते 14 हजार कामगार रोज काम करत आहेत, अशी माहितीहही त्यांनी दिली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



