
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी सातव्यांदा उपोषण सुरू केलं आहे. याआधीही जरांगे पाटलांनी अनेक आंदोलनं केली होती. मात्र, त्या आंदोलनातून मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जरांगेंनी थेट मुंबईत धडक दिली आहे. तेव्हा जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतिहास सांगणारा हा रिपोर्ट खालीलप्रमाणे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांनी अंतरावालीहून निघत थेट मुंबई गाठली. राज्य सरकारनं दिलेल्या वेळेत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी केलेलं हे काही पहिलं उपोषण नाहीये. या मराठा आरक्षणाची पहिली ठिणगी पडली ती म्हणजे अंतरवाली सराटीमधून. जरांगेंच्या केलेल्या पहिल्या आंदोलनाला आज दोन वर्षही पूर्ण झाली आहेत.
29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरावली सराटीत जरांगे पाटलांनी पहिलं उपोषण सुरू केलं होतं. दरम्यान यावेळी अंतरवालीत सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात दगडफेक झाली होती. या घटनेत पोलिसांसह काही आंदोलन देखील जखमी झाले होते. तेव्हापासून मराठा आरक्षणाची धग ही
आणखीनच तिव्र झाली होती.
25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर 2023
ठिकाण : अंतरवाली सराटी
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी अंतरवालीत उपोषण केलं. सरकारनं आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे जरांगे
पाटील हे आक्रमक झाले होते. दरम्यान जरांगे पाटलांचं हे आंदोलन सुरू असताना माजलगाव आणि बीडमध्ये जाळपोळीची घटना घडली होती. न्यायमूर्ती एम.जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांनी काढलेल्या समजूतीनंतर जरांगेंचं उपोषण मागे
26 जानेवारी 2024
ठिकाण : नवी मुंबई
जरांगे पाटलांनी सरकारला वेळ देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जरांगेंनी थेट मुंबईत धडकण्याचा इशारा दिला होता. 20 जानेवारीला जरांगे पाटील
मुंबईकडे निघाले होते. 26 जानेवारी रोजी जरांगे मुंबईच्या वेशीवर आलेत. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये जरांगेंनी सरकारविरोधात मोर्चा उघडला
होता. मात्र, गिरीश महाजन आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगेसोय-यांच्या अध्यादेश काढल्यानंतर जरांगे माघारी फिरलेत.
10 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोय-याच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंनी पुन्हा आंदोलन केलं. हे आंदोलन सुरू असताना हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलं होतं. जरांगे पाटलांची तब्येत खालावल्यानं उपोषण मागे घेतलं.
4 जून 2024 ते 10 जून 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषण पुकारलं. उपोषणाच्या सहाव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची भेट घेतली आणि त्यानंतर 10 जून रोजी शंभूराज देसाईंची शिष्टाई फळाला आली आणि जरांगेंनी उपोषण सोडलं.
20 जुलै 2024 ते 24 जुलै 2024
ठिकाण : अंतरवाली सराटी
आधीची उपोषण करूनही सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे जरांगेंनी पुन्हा उपोषण केलं.. मात्र, पुन्हा एकदा तब्येत
खालावल्यानं जरांगेंनी आपलं उपोषण सोडलं.
25 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025
ठिकाण : अंतरवाली सराटी
सगेसोय-यांची अंमलबजावणी तसंच ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आमक्रक झाले होते..
दरम्यान यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळांनी लेखी आश्वासन
दिल्यानंतर सुरेश धस यांच्या हातून जरांगेंनी उपोषण सोडलं.
29 ऑगस्ट 2025
ठिकाण : आझाद मैदान
वारंवार उपोषण करून आणि वेळ देऊनही सरकारनं मागण्या पूर्ण न केल्यामुळे जरांगे पाटलांनी थेट मुंबईत धडकण्याचा निर्णय घेतलाय आणि सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू केलंय. दरम्यान जरांगेंच्या या उपोषणानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.