digital products downloads

अकोला शहरात धक्कादायक प्रकार, रील बनवण्याचा बहाणा अन् तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास

अकोला शहरात धक्कादायक प्रकार, रील बनवण्याचा बहाणा अन् तब्बल 20 लाखांचा ऐवज लंपास

जयेश जगड, झी मिडिया, अकोला: अकोला शहरातून एक आश्चर्यजनक घटना समोर आली आहे. अकोला शहरातील जुन्या शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 12 फेब्रुवारी रोजी एका घरात मोठी चोरी झाली. घरातून तब्बल 19 लाखांचे सोन्याचे दागिने आणि 90 हजारांची रोकड असा एकूण जवळपास 20 लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली.तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अवघ्या 9 दिवसांत या गुन्ह्याचा उलगडा केला.

Add Zee News as a Preferred Source

 

रील बनवण्याच्या बहाण्याने घरात आली अन्…

तपासादरम्यान समोर आलेल्या बाबी धक्कादायक आहेत. फिर्यादी महिलेची शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी ओळख झाली होती. हळूहळू दोघींमध्ये घट्ट मैत्री निर्माण झाली. आरोपी महिलेने विश्वास संपादन केला आणि दोघी मिळून रील्स तयार करू लागल्या. घटनेच्या दिवशीही रील बनवण्याच्या बहाण्याने आरोपी महिलेनी फिर्यादी महिलेला आपल्या घरी बोलावलं आणि रील शूट करताना तिने फिर्यादीचे लक्ष विचलित केले आणि संधी साधत अलमारीतून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे 20 लाखांचा ऐवज चोरला. 

 

आरोपींकडून सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

यानंतर आरोपी महिलेने चोरीचे दागिने आणि रोकड आपल्या मित्रांकडे लपवून ठेवली आणि सर्व काही सामान्य असल्याचे भासवत शांत बसली. मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांची चौकशी सुरू केली. सखोल तपासानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या शहर पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल जप्त करून एक महिला आणि तिच्या तीन साथीदारांना अटक केले आहे. सध्या पुढील तपास करत आहेत. 

 

अनोळखी व्यक्तीसोबत रिल्स बनवणे टाळा

आजकाल सर्वचजण लाईक्स आणि व्ह्युव्सच्या नादात अक्षरश: काहीही करतात. अनेकजण स्वतःचा जीव धोक्यात घालूनही रील्स बनवत असतात. दररोज अशा अनेक बातम्या समोर येत असतात. सोशल मिडियावर असे अनेक इन्फ्लुएन्सर असतात जे अनोळखी व्यक्तीसोबत रिल्स बनवत असतात, नवीन ओळखी निर्माण करत असतात. पण फक्त सोशल मिडियावरील प्रसिद्धीसाठी अनोळखी किंवा नवीन ओळखीच्या व्यक्तींवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे किती महागात पडू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. 

 

वेळीच सावध व्हा…

बरेचजण सोशल मिडियावर मिनी व्लॉग बनवत असतात. ज्यामध्ये ते रोज त्यांच्या दैनंदिन जीवनात काय करतात यासगळ्याबद्दल सांगतात. पण यामुळे ते नकळत त्यांची सर्व खासगी माहिती उघड करत असतात. ज्यामध्ये ते रोज त्यांच्या दैनंदिन जीवनात काय करतात? कुठे जातात? कुठे राहतात? त्यांचे नातेवाईक, फ्रेंडसर्कल, काम यासगळ्याच माहितीचा समावेश असतो. यामुळे तुम्हाला लाईक्स आणि व्हुव्स तर मिळतील पण गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना याचा चांगलाच फायदा होईल. आणि कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे जर तुम्ही यांसारख्या रील्स मेकर्सच्या यादीत असाल तर वेळीच सावध व्हा.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp