
राजूर ग्रामीण रुग्णालयात बालकाची विचारपूस करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे.
तालुक्यातील राजूर, विठे व परिसरातून २३ एप्रिलपासून कावीळ साथीचे थैमान सुरूआहे. रविवारपर्यंत (४ मे) काविळीच्या रुग्णांची संख्या २६३ वर गेली होती. शिवाय खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल रुग्णव तालुक्याबाहेरील रुग्णालयात उपचारघेणारे रुग्णांची सं
.
दरम्यान, दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जलसंपदा मंत्रीराधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारीराजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रत्यक्ष भेटदेऊन रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चाकरून उपचारांची माहिती घेतली. दूषितपाण्यामुळे निर्माण झालेल्या कावीळसाथरोग पार्श्वभूमीवर अशी परिस्थितीकोठेही उद्भवू नये, यासाठी अहिल्यानगरजिल्ह्यातील सर्व ठिकाणांच्या जलस्त्रोतांची तपासणी तातडीने करण्याची सूचना विखेयांनी प्रशासनास केली आहे. राजूर परिसरातील कावीळ साथ नियंत्रणात आणण्याची व आलेले संकट रोखण्याची नागरिक व प्रशासनासह आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून ग्रामस्थ व प्रशासनाने परस्परांमधील समन्वयाने हे कार्य करण्याचे आवाहन मंत्री विखे यांनी केले.
यावेळी आमदार डाॅ. किरण लहामटे,माजी आमदार वैभव पिचड यांच्यासहराजूर ग्रामस्थ व विविध सामाजिकसंघटनांच्या प्रतिनिधी, राजकीयपदाधिकाऱ्यांसोबत मंत्री विखे यांनी राजूरयेथे कावीळ प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत बैठक घेतली. राजूरमध्ये दूषित पाण्यानेच कावीळ साथरोग नियंत्रणात येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
बैठकीत पालकमंत्र्यांनी ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेतल्या.दरम्यान, झालेल्या चर्चेतून समोर आलेले वास्तवादी मुद्दे लक्षात घेऊन कावीळ साथ आटोक्यात आणण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विखे यांनी तातडीने प्रशासनास सर्वतोपरी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना विनाविलंब पुरवण्यासाठी राजूर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची स्वतंत्र टीम पूर्णवेळ तैनात राहणार आहे. कावीळग्रस्त व संशयीत रुग्णांच्या रक्त तपासणी अहवालात होणारी दिरंगाई दूर करण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी आमदार वैभव पिचड, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीआशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे, विनय सावंत उपस्थित होते.
आशा सेविकांमार्फत सर्वेक्षण
तालुक्यातील तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी अनुपस्थित राहत असल्याचीतक्रार ग्रामस्थांनी केली. त्याची दखलघेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनीप्रशासनातील सर्व अधिकारी वकर्मचाऱ्यांनी कावीळ साथ आटोक्यातयेईपर्यंत मुख्यालय सोडू नये. कोविडचाअनुभव लक्षात घेता, आशासेविकांमार्फत राजूर व शेजारीलगावांमधील कुटुंबाचे सक्रीय सर्वेक्षणकरण्याचे निर्देश दिले. रुग्णांचे रक्तनमुनेतपासणीसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचेविशेष पथक कार्यरत करून राजूर ग्रामीणरुग्णालयातून प्राथमिक उपचार सुविधासुरू करण्यात आल्या. पाण्यातजंतुनाशक औषधांचा वापर व रक्ततपासणीसाठी लागणारी यंत्रणा जिल्हानियोजन व विकास समितीच्यामाध्यमातून तातडीने उपलब्ध करूनदेण्याचे आदेश विखे यांनी दिले आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.