
राज्यात सध्या सुरू असलेल्या तीव्र गॅस टंचाईचा फटका आता थेट मानवी जिवावर बेतू लागला आहे. एकीकडे कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेले असताना, दुसरीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. अशाच एका रांगेत उभ्या असलेल्या अकोला ज
.
अन्वी मिर्झापूर येथील यदुराज गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे देखील आपला नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. एकीकडे भीषण उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे तासन्तास उभे राहिल्याने आलेला थकवा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. उपस्थित नागरिकांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
गावच्या माजी सरपंचाला एका गॅस सिलिंडरसाठी अशा प्रकारे जीव गमवावा लागल्याने अन्वी मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे. व्यवस्थेतील त्रुटी आणि वितरणातील गोंधळामुळेच एका सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
शिरसाटांच्या मृत्युला सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. “गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची पूर्वसूचना असतानाही सरकारने कोणतेही पाऊल उचलले नाही. जर प्रशासनाने वेळेवर योग्य नियोजन केले असते, तर आज शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या मृत्यूला पूर्णपणे सरकारची नियोजनशून्यताच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा मी धिक्कार करतो. यापुढे गॅस सिलेंडरसाठी माणसे दगावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी विनंतीही प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे केली.
नागरिकांची अग्निपरीक्षा
राज्यात एकीकडे पारा ४० अंशांच्या वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे घरगुती गॅससाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस वितरणाचे वेळापत्रक कोलमडले असून, एजन्सी चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
हे ही वाचा…
गॅसचा तुटवडा नाही, तर रॉकेल का देताय?:भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले – अफवा पसरवण्यात भाजपचा हात कुणीच धरू शकत नाही
राज्यातील इंधन टंचाई, गॅसचा तुटवडा आणि वाढत्या भोंदूगिरीच्या प्रकरणावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः देशात कोरोनासारखी स्थिती पुन्हा उद्भवू शकते असे सांगून इशारा देत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील मुख्यमंत्री कशाचाही तुटवडा नसल्याच्या बढाया मारत आहेत,” अशा शब्दांत जाधवांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील विसंगतीवर बोट ठेवले. तसेच “गॅसचा तुटवडा नाही म्हणता, मग केरोसिन का देता?” असा सवाल करत, “अफवा पसरवण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



