digital products downloads

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून महिलांचा सत्कार: जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील कार्याचा गौरव – Amravati News

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाकडून महिलांचा सत्कार:  जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांतील कार्याचा गौरव – Amravati News



अमरावती | अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. वलगाव येथील कांचन रिसोर्ट येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. शोभना देशमुख यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महिला मंचाच्या प्रदेश अध्यक्ष कांचन मुरके यांच्या प्रयत्नांतून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. अनुभूती पाटील, महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक राजश्री जढाळे, नगरसेविका सुरेखा लुंगारे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर सुने, राष्ट्रीय संघटक तथा प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष युसुफभाई खान, विदर्भ कार्याध्यक्ष अक्षरा लहाने आणि ॲड. पूनम झंवर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान गायन, कथक, नृत्य आणि सुंदर कविता सादरीकरण यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यात आयुर्वेदाचार्य डॉ. माया बोरखडे, क्रीडा क्षेत्रातील हर्षा ढोक, उद्योग क्षेत्रातील कांचन उल्हे, वैशाली बरडे, कविता घाटोळ आणि श्रुतिका तायडे, आरोग्य सेवेतील कांता काळे, समुपदेशक कविता बोंडे, पत्रकारितेतील मीनाताई राहिंज, नृत्यकलेतील आदित्य मेहता, शिक्षण क्षेत्रातील प्रा. डॉ. मंजुषा सागर, गायन क्षेत्रातील गौरी सतके, लेखन क्षेत्रातील सुयोगा संतापे आणि सहायक कृषी अधिकारी अलकाताई तल्हार (टोंगलाबाद) यांचा कृषी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. वितरण विभाग सर्फापूर येथील वरिष्ठ यंत्रचालक दिनेश भटकर यांचा ३० वर्षांच्या सेवेनंतर सपत्नीक सन्मान करण्यात आला. तसेच, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जढाळे यांचा पोलीस खात्यातील ३४ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सरचिटणीस राजेंद्र भुरे, उपाध्यक्ष अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे, भातकुली तालुका अध्यक्ष संजय तराळ, अमरावती जिल्हाध्यक्ष सुधाकर टिपरे, केंद्रीय संघटक जयश्री पंडागरे, विधी सल्लागार किरण भुते, जिल्हा सचिव मनोज मेळे, शहराध्यक्ष किशोर बरडे, कार्याध्यक्ष हर्षा पाटील, महाराष्ट्र प्रदेश संघटक दिनेश भटकर, महानगर उपाध्यक्ष संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष प्रेम कारेगावकर, सचिव अरविंद लुंकड, डॉ. राहुल अहिर आणि वर्षा गाडगे यांच्यासह अनेक पत्रकार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. मंजुषा सागर यांनी आभार प्रदर्शन केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp