
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. चंद्रहार पाटील यांनी आज अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडी पाहता चंद्रहार पाटील यांचा शिंदे गटातील प्रवेश सो
.
काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. तसेच हा पक्षप्रवेश रोखून दाखवावा असे आव्हान उद्धव ठाकरे यांना दिले होते. आज अखेर संजय शिरसाटांचा दावा खरा ठरला असून, चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत अनधिकृतपणे जाहीर प्रवेश केला. यावेळी इतरही बडे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
नेमके काय म्हणाले चंद्रहार पाटील?
पक्षप्रवेश झाल्यानंतर चंद्रहार पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. माझ्या पक्षप्रवेशासाठी ज्यांनी अट्टहासाने प्रयत्न केले. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली काम करावे, अशी राम रेपाळे, शरद कणसे काका यांची इच्छा होती. त्यांचे मी आभार मानतो, अशा भावना चंद्रहार पाटलांनी यावेळी पक्षप्रवेशावेळी व्यक्त केल्या.
एकनाथ शिंदेंची जोरदार टोलेबाजी
चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे बोलताना तुफान फटकेबाजी केली. चंद्रहार पाटील हे नकली आखाड्यातून असली आखाड्यात आले आहेत. पाटील तुम्ही कुटील माणसाकडून स्वच्छ मनाच्या माणसाकडे आला आहात. हा हॉल नाही तर आखाडा झाला आहे त्यामुळे पैलवानांच्या शिट्ट्या तर ऐकू येणारच, असे शिंदे म्हणाले. आता यापुढे ज्याची होणार नाही हार तो तुमचा आवडता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार. चंद्रहार पाटील आम्हाला सगळ्यांना तुमचा अभिमान आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
2022 ला सगळ्यांना चारी मुंड्या चीत केले
कुस्तीत अनेक डावपेच असतात. मी कुस्तीतला पैलवान नसलो तरीही 2022 समोरच्या सगळ्यांना चारी मुंड्या चीत केलं. असे डावपेच टाकले की अजून ते उठलेच नाहीत. पैलवान हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहेत. त्यामुळे चंद्रहार पाटील यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे. सांगलीची माणसं चांगलीच असतात, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ही शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही
वाघाचे कातडे पांघरुन लांडगा कधी वाघ होत नाही. त्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच लागतात. ज्याने बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले त्यांना त्याची प्रचिती येते आहे. ही शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची आहे, टोमणे सम्राटांची नाही, असाही टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. हा एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्ता आहे. हा पक्ष तुमचा आहे, इथे काही कुणी मालक नाही. राजा का बेटा राजा नहीं बनेगा असे श्रीकांत शिंदेही म्हणाले होते. आता सांगलीचा ढाण्या वाघ खऱ्या जंगलात आला आहे. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी टोलेबाजी करत जोरदार भाषण केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.