
Vaishnavi Hagawane Death Case: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांची सून वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यादरम्यान वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला फोन करुन व्यथा मांडल्याचा फोन कॉल समोर आला आहे. यामध्ये वैष्णवी मैत्रिणीला आपल्याला कशाप्रकारे शिव्या घातल्या जात असल्याचा तसंच अत्याचार होत असल्याचं सांगत आहे.
फोन कॉलमध्ये वैष्णवी काय सांगत आहे?
“तुझ्या मैत्रिणींना तू किती घाणेरडी आहेस हे सांगते. तू शशांकसोबतही कधी एकनिष्ठ राहिली नाहीस. तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. घाण शिव्या देऊ लागली. आईला, पप्पांना काहीही बोलू लागली. मगाशी पप्पा, मम्मी बसले होते त्यामुळे मला बोलता आलं नाही. डॅडी मला मारताना पाहत होते. नंतर त्यांनीही माझ्यावर हात उचलला. त्यांनाही खरं वाटलं आहे,” असं वैष्णवी फोनवरुन मैत्रिणीला सांगते.
पुढे ती सांगते, “पप्पा मला यावर विचार करु म्हणालेत. माझा नवराच माझ्याकडे आला नाही याचं जास्त वाईट वाटत आहे. सासू सासऱ्यांचं असं वागण्याचं काम असतं. पण ज्याच्यामुळे मी त्या घऱात गेले, लय चुकलं माझं. सर्वांना विरोध करुन लग्न केलं तिथंच चूक झाली माझी. सगळं बोलणं, समजण्यापलीकडे गेलं आहे. तुला ही छोटी गोष्ट वाटते का? माझ्या आयुष्यात विचारही केला नव्हता. मला इतकं घाण बोललेत, शिव्या देत असतात”.
पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला समोर
वैष्णवी हगवणेने (Vaishnavi Hagawane) आत्महत्या केल्यानंतर तिचा शवविच्छेदने अहवाल समोर आला आहे. यामध्ये शरीरावर अनेक बोथट जखमा आढळून आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच मानेच्या अस्थिबंधन दाबामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीदेखील एक्सवर हा अहवाल शेअर केला आहे. तसंच अजित पवारांना वैष्णवीला न्याय देणार का? अशी विचारणा केली आहे.
“जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये माहेरून आण म्हणून सुनेचा अत्याधिक छळ करून तिची हत्या /आत्महत्या इथपर्यंत मजल मारणाऱ्या मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष राजेंद्र हगवणेला अटक कधी होणार ? अजितदादा, तुम्ही सत्तेत आहात.पदाधिकाऱ्याला वाचवणार की हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवीला न्याय देणार?,” असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी
वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी अन चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला होता. तसंच पती शशांक हा चारित्र्यावरून संशयही घेत होता. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्यानं राजेंद्र हगवणेंची लहान सून वैष्णवीचा जीव गेला. अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर 2024मध्ये तिने पौड पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हाही दाखल केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.