digital products downloads

‘अजितदादांची इच्छा…’ सयाजी शिंदेंनी यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन नेमकं काय सांगितलं?

‘अजितदादांची इच्छा…’ सयाजी शिंदेंनी यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेऊन नेमकं काय सांगितलं?

Sayaji Shinde on Ajit Pawar Last Wish : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीत विमान अपघातात निधन झालं. पवार कुटुंबासोबतच संपूर्ण देशासाठी हा खूप मोठा आघात आहे. अजूनही अजित पवार यांच्या अचानक जाण्याने खूप मोठी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं आहे. अजित पवारांचं निधन झालं त्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या. ज्यामध्ये अजित पवारांची अर्धवट राहिलेल्या इच्छेचा वारंवार उल्लेख होत असल्याचं समोर येत आहे. या सगळ्यावर अभिनेता सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीत त्यांनी अजित पवारांची शेवटच्या इच्छेचा उल्लेख केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे आणि अजितदादांची इच्छा पूर्ण करावी असं अभिनेते सयाजी शिंदे यांनी सुनेत्रा पवारांना विनंती केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त करत दादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करावी अस ते म्हणाले आहेत. बारामती येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची त्यांनी आवर्जून सांत्वनपर भेट घेतली.

(हे पण वाचा – ‘अजित पवारांच तेरावं…” सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय)

‘दोन्ही राष्ट्रवादींनी… ‘ – सयाजी शिंदे 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी बारामती येथे जात सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते भावूक झाले होते. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी (शरद पवार गट आणि अजित पवार गट) आता हेवेदावे सोडून एकत्र यावे, अशी कळकळीची विनंती शिंदे यांनी केली. “अजितदादांची हीच शेवटची इच्छा होती आणि ती पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी बारामती येथे जाऊन सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे अत्यंत भावूक झाले होते. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाबाबत एक महत्त्वाचे विधान केले. विलीनीकरणाचे आवाहन: महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक स्थैर्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी (शरद पवार गट आणि अजित पवार गट) आता सर्व हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले. अजितदादांची शेवटची इच्छा: “दोन्ही गट एकत्र यावेत हीच अजितदादांची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे शिंदे यांनी नमूद केले. राजकीय चर्चा: निधनापूर्वी दोन्ही गट एकत्र येण्याबाबत काही प्राथमिक चर्चा झाल्या होत्या, असा दावाही सयाजी शिंदे यांनी यावेळी केला. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असून, सयाजी शिंदे यांच्या या आवाहनानंतर आता दोन्ही गट काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp