
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींमध्ये जाऊ नये. त्यांच्या तिथे जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सोमय्या यांना खडेबोल सुनावताना व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर सत
.
राज्यातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी किरीट सोमय्या यांना उपरोक्त शब्दांत समज दिली. किरीट सोमय्या यांनी भोंग्यांच्या मुद्यावर थेट मशिदीत जाऊन तपासणी करत असल्याचे समोर आले होते. त्यावर मुस्लिम संघटनांच्या तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर दबाव टाकून कारवाई केली तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला सर्वस्वी सोमय्या जबाबदार असतील, असे या संघटना म्हणाल्या होत्या.
कुणावरही चुकीची कारवाई होता कामा नये – पवार
त्यावर अजित पवारांनी त्यांचे समर्थन करत सोमय्या यांना मशिदीत न जाण्याची कडक शब्दांत समज दिली. किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असे ते म्हणाले. अजित पवारांनी आजच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पोलिस महासंचालकांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याची काळजी घेण्याचीही सूचना केली.
त्यांच्या निर्देशांनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हायकोर्टाने भोंग्यांच्या आवाजाविषयी 46-56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे अशक्य असल्याचे सांगितले. तसेच प्रस्तुत बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाजही 46 डेसिबलहून अधिक असल्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांपुढे करून दाखवले. त्यावरही योग्य तो उहापोह करण्यात आला. भारती यांनी यावेळी मुंबईतील 1500 अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचीही माहिती दिली.
काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली नाराजी
दुसरीकडे, काँग्रेस नेते नसीम खान यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांना वाटते की, भोंग्यांची परवानगी घेण्यात आली नाही. पण सुप्रीम कोर्टाचे नियम हे डेसिबल मेंटेन करण्यासंबंधीचे आहेत. पोलिस शक्ती प्रदर्शन करत भोंगे काढत आहेत. आमची पोलिसांना मदत करण्याची तयारी आहे. हा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. संपूर्ण देशात कुठे असे नियम आहेत. हे नियम गुजरातमध्येही नाहीत, असे ते म्हणालेत.
सोमय्यांनी हेतुपूर्वक वाद घडवला – अबू आझमी
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी यावेळी किरीट सोमय्यांवर हेतुपुरस्सर वाद निर्माण करण्याचा आरोप केला. किरीट सोमय्या यांनी हेतुपुर्वक हा वाद उपस्थित केला. इथे महायुतीचा संबंध येत नाही. या वादावर तोडगा काढण्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही हा विषय अधिवेशनात काढणार नाही. कारण, त्याला वेगळे वळण दिले जाते. अजित पवारांनी मुस्लिमांवर टीका झाल्यास त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा शब्द दिला होता. ते आता काय करत आहेत. सोमय्या मशिदीबाहेर कॅमेरे नेऊन व्हिडिओ करत आहेत. मशिदींवरील 1500 भोंगे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण हाच नियम मंदिरांबाबतही लागू आहे. ध्वनी प्रदुषण केवळ अजानमुळे होत नाही, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.