digital products downloads

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण: रनवे सोडून विमान हायवेकडे, विमान लँडिंगचा निर्णय चुकला, ‘AAIB’ चा अहवाल

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण:  रनवे सोडून विमान हायवेकडे, विमान लँडिंगचा निर्णय चुकला, ‘AAIB’ चा अहवाल

  • Marathi News
  • National
  • Aircraft Accident Investigation Bureau’s Preliminary Report On Ajit Pawar’s Plane Crash

नवी दिल्ली20 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

२८ जानेवारी रोजी सकाळी ८:४६ वाजता बारामतीतील भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताचा २२ पानी प्राथमिक तपास अहवाल ‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट अपघात तपास ब्युरो’ने (एएआयबी) प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे की, वैमानिकाला पहिल्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक ११ वर विमान उतरवता आले नाही.

म्हणून त्याने पुन्हा एक फेरी मारली. दुसऱ्यांदा वैमानिकाने केवळ ३ किमी दृश्यमानता असूनही लँडिंगचा निर्णय घेतला. रनवेपासून (धावपट्टी) ३०० फूट हायवेच्या दिशेने विमान वळवले. एटीसीकडून संदेश आल्यावर धावपट्टीकडे नेले. तेव्हा डाव्या बाजूच्या झाडावर आदळून विमान कोसळले. त्याला भीषण आग लागली.

२२ पानी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे असे.

विमान लँडिंग करण्यासाठी १०७ हा ॲप्रोच कोर्स योग्य होता. पण वैमानिकाने ११० हा ‘ॲप्रोच कोर्स’ निवडला आणि त्या दिशेने लँडिंग प्रक्रिया सुरू केली. विमानतळाची भौगोलिक रचना आणि केवळ ३ किलोमीटरची दृश्यमानता असताना असे करणे ही एक चूक होती. जी या अपघाताच्या घटनाक्रमात

एक महत्त्वाचा घटक आहे. बारामती टॉवर आणि लिअरजेट 45XR (VT-SSK) विमानातील संभाषणाच्या ट्रान्सक्रिप्टवरून ‘फायनल अप्रोच कोर्स’बाबत काहीतरी गडबड झाल्याचे दिसते. २८ जानेवारी रोजी ०८:४०:२७ वाजता, दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना, वैमानिकाने बारामती येथील टॉवरला (एटीसी) स्पष्टपणे विचारले: “REQUESTING FINAL APPROACH COURSE CONFIRM ONE ONE ZERO” (फायनल अप्रोच कोर्स ११० असल्याची खात्री करा).

त्यावर बारामती टॉवरने ०८:४०:३० वाजता तत्काळ सांगितले “NEGATIVE MAM 107” (नाही मॅडम, १०७ आहे). ०८:४०:३२ वाजता वैमानिकाने योग्य कोर्सची (“107 VSK”) अशी दुरुस्त पोचही दिली. कुणालाही दोषी ठरवलेले नसले तरी अहवालाच्या पान क्र. १२,१३ वरील माहिती ३-डिग्रीची चूक अपघातास कशी कारणीभूत ठरली असावी, याचे संकेत देते. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता ५ ऐवजी ३ किमी होती. अशा स्थितीत ३-डिग्रीच्या फरकाचा अर्थ असा होतो की वैमानिक चुकीच्या ठिकाणी धावपट्टी शोधत आहे. विमान वाहतुकीच्या भूमितीनुसार १ नॉटिकल माइल अंतरावर ३-डिग्रीची चूक विमानाला मुख्य रेषेपासून ३०० फुटांपेक्षा जास्त दूर नेऊ शकते. एएआयबीच्या या अहवालानुसार विमानाचे ‘क्रॅश-लँडिंग’ धावपट्टी क्र. ११ च्या तोंडावर डाव्या बाजूला अंदाजे ५० मीटर (१६४ फूट) डावीकडे झाला.

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण: रनवे सोडून विमान हायवेकडे, विमान लँडिंगचा निर्णय चुकला, 'AAIB' चा अहवाल

उशिरा लक्षात आले : ११० ॲप्रोच कोर्सकडे जाणारे विमान विमानतळाच्या

मध्यरेषेच्या उजवीकडे गेले आणि अचानक त्यांना डाव्या बाजूला धावपट्टी दिसली. अशा वेळी दृश्यमानतेमध्ये शेवटच्या क्षणी बदललेली दिशा सुधारण्यासाठी घेतलेले वळण विमानाला मोठ्या “अस्थिर” स्थितीमध्ये नेऊन ठेवू शकते.

अजित पवारांचे विमान अपघात प्रकरण: रनवे सोडून विमान हायवेकडे, विमान लँडिंगचा निर्णय चुकला, 'AAIB' चा अहवाल

सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसले की, झाडांवर आणि नंतर जमिनीवर आदळण्यापूर्वी विमान उजवीकडे चांगलेच कलंडले होते. (विमान वाहतूक तज्ज्ञांच्या माहितीनुसार)

११० नव्हे १०७ : एटीसीचा संदेश, तरीही…

हायवे म्हणजे धावपट्टी नाही असे लक्षात येऊन विमान वळवले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. वैमानिकाने (हायवेला धावपट्टी समजून) ॲप्रोच कोर्स ११० निश्चित असा संदेश पाठवला. त्यावर एटीसीने निगेटीव्ह मॅम १०७चा संदेश दिला. त्यानुसार शेवटच्या क्षणी पायलटने विमान धावपट्टीकडे वळवले. धावपट्टी अखेरच्या क्षणी जवळपास ९० अंशांत विमान वळवले

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp