digital products downloads

अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीची CID चौकशी! 4 तास प्रश्नोत्तरे; विचारले ‘हे’ प्रश्न

अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तीची CID चौकशी! 4 तास प्रश्नोत्तरे; विचारले ‘हे’ प्रश्न

Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावजळ अपघात झाला आणि या अपघातामध्येच अजित पवारांसहीत विमानातील इतर पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त होत असतानाच दुसरीकडे अमोल अजित पवारांच्या पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा अपघात आहे की घातपात अशी शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात शंका घेतली जात असतानाच दुसरीकडे सीआयडीने अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची आज या प्रकरणासंदर्भात चौकशी केली. 

Add Zee News as a Preferred Source

बारामती दौऱ्याची माहिती घेतली

सीआयडीने  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट यांच्याकडून जाणून माहिती घेतली. सीआयडी अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या खाजगी सचिवांकडून बारामती दौऱ्याची माहिती घेतली. 28 जानेवारी रोजी अजित पवारांच्या दौऱ्याबाबत माहिती घेण्यासाठी सीआयडी अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. 27 जानेवारीच्या रात्री दौऱ्याबाबत काही चर्चा झाली होती का, याबाबत देखील अविनाश सोलवट यांची चौकशी केली. अजित पवारांच्या प्रवासाचे नियोजन कसे आणि कोणी केले होते याबाबत सुद्धा विचारपूस करण्यात आली.

नक्की वाचा >> ‘अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? विमानाचा दोनदा…’; ‘सर्व सीसीटीव्ही फुटेज…’

चार तास चौकशी; कोणते प्रश्न विचारले?

अविनाश सोलवट यांची चौकशी मंत्रालयात करण्यात आली. ही चौकशी चार तासांहून अधिक वेळ सुरु होती. त्यांना अजित पवार यांच्या 28 जानेवारीच्या बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचे तपशील, 27 जानेवारी रात्रीच्या चर्चा आणि इतर संबंधित माहितीविषयी प्रश्न विचारले गेले. या प्रश्नांच्या उत्तरांमधून अपघाताच्या कारणांसाठी तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर तपशील काही गोष्टी कारणीभूत ठरल्या का याचा अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाणार आहे.

एकूण तीन टप्प्यांमध्ये तपास

अजित पवारांच्या विमानत अपघाताची तीन स्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे. दुसऱ्या स्तरावर विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार. यामधून विमान जमीनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे. तर अपघाताचा प्राथमिक अहवाल तिसऱ्या टप्प्यामध्ये सादर केला जाणार आहे.

नक्की वाचा >> थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने ‘बरोबरच जाऊ’, पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम

अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp