
Ajit Pawar Death Plane Crash Election Commission: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. बारामती विमानतळावर लॅण्डींगच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये अजित पवारांसहीत एकूण पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अजित पवारांसाराख्या लोकनेत्याचा असा विचित्र पद्धतीने मृत्यू झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. केवळ घरातील सदस्य नाही तर सर्वपक्षीय नेते मंडळींबरोबरच अगदी लाखो कार्यकर्तेही शोकाकुल झाले आहेत. अजित पवारांच्या पार्थिवावर 29 जानेवारी रोजी अत्यंस्कार करण्यात आले. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी अजित पवारांच्या अस्थिचं विसर्जन करण्यात आलं. शुक्रवारी, 6 फेब्रुवारी रोजी अजित पवारांचा दशक्रीया विधी बारामतीमधील सहयोग सोसायटीमधील घरी पार पडला. आता अजित पवारांच्या विमान अपघाताच्या अहवालात काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच अजित पवार हे बारामतीचे आमदारही असल्याने आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे.
निवडणुक आयोगाने कोणती घोषणा केली?
पुणे जिल्ह्यातील 201–बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आमदार होते. त्यांच्या निधामुळे रिक्त झालेली जागा भरण्यासाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अन्वये 201–बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मतदारयादी कार्यक्रम जाहीर केला आहे.
नक्की पाहा हे फोटो >> सुनेत्रा पवारांच्या बारामतीमधील घरातील ‘ते’ फोटो चर्चेत; दोन्ही NCP एकत्र येण्याचा मार्ग मोकळा?
संक्षिप्त पुनर्निरीक्षण मतदारयादी म्हणजे काय?
विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण मतदारयादी ही भारतीय निवडणूक आयोग राबवत असलेली प्रक्रिया आहे. यामध्ये मतदारयादी अद्ययावत केली जाते. ही प्रक्रिया मुख्यतः निवडणुकांपूर्वी केली जाते. या प्रक्रियेमध्ये नवीन पात्र मतदारांची म्हणजेच 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची किंवा मतदारसंघ बदललेल्या व्यक्तींची नोंदणी मतदार म्हणून केली जाते. त्यावेळी दुसरीकडे मृत व्यक्ती, डुप्लिकेट नावे किंवा अपात्र मतदारांची नावं यादीमधून काढली जातात. या प्रक्रियेचं उद्दिष्ट मतदारयादी अचूक, अद्ययावत आणि समावेशक ठेवण्याचा असतो.
पुतण्याला पराभूत करुन निवडून आलेले अजित पवार
अजित पवार 2024 मध्ये बारामती विधानसभा निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतरची ही बारामतीसारख्या बालेकिल्ल्यातील शरद पवार आणि अजित पवारांसाठी महत्त्वाची निवडणूक होती. दोन्ही बाजूने ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय करण्यात आली होत.
नक्की वाचा >> पार्थ पवारांकडे NCP चे अध्यक्षपद? शरद पवार आग्रही; पण NCP आमदार, खासदारांना ‘या’ व्यक्तीला करायचंय अध्यक्ष
अखेर अजित पवारांनी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार (एनसीपी शरदचंद्र पवार गट) यांना 1 लाख 899 मतांनी पराभूत केले होते. अजित पवारांना एकूण 1 लाख 81 हजार 132 मते मिळाली होती. तर युगेंद्र पवारांना 80,233 मते मिळालेली. हा अजित पवारांचा बारामतीतून सलग आठवा विजय ठरला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



