digital products downloads

अजित पवारांच्या निधानानंतर राज्यात दुखवटा जाहीर झाला असताना 75 फायलींवर सह्या; अधिकाऱ्यांचा संतापजनक कृतीमुळे खळबळ

अजित पवारांच्या निधानानंतर राज्यात दुखवटा जाहीर झाला असताना 75 फायलींवर सह्या; अधिकाऱ्यांचा संतापजनक कृतीमुळे खळबळ

Ajit Pawar : राज्यात 75 शाळांना अचानक अल्पसंख्याक दर्जा मंजूर झाल्याने  खळबळ उडाली आहे. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे निधन झाले. यानंतर काही तासांत  या प्रस्तावावर सह्या झाल्याची माहिती समोर येताच अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणी आता चौकशी करुन दोषींवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली. 

Add Zee News as a Preferred Source

नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधानाच्या दिवशी राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालय आणि विभागांना सुट्टी होती. असं असताना देखील त्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागात डिजिटल प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला, क काँग्रेसचे अक्षय जैन यांनी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमताने डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्रे वितरित केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान ज्या अल्पसंख्याक विभागानं या प्रमाणपत्रांचं वाटप केलंय, ते अल्पसंख्याक खातं हे अजित पवारांकडे होते, या प्रमाणपत्र वाटपावर आधी माणिकराव कोकाटेंनी स्थगिती दिली होती. तीच स्थगिती अजित पवार यांनी देखील कायम ठेवल्याचं अक्षय जैन यांनी म्हटलंय, तर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे.  राज्यातील अनेक शाळांना या अल्पसंख्याक प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आले आहे. शाळांना वाटप केलेल्या प्रमाणपत्रांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून रोहित पवारांनी देखील ट्विट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. सर्वच वंगाळ झालंय, माणसाची काही किंमत आहे कि नाही ?  थोड्या फार तर भावना, संवेदना असायला हव्यात की नाही ? असे प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले आहेत. 

या शाळांना प्रमाणपत्राचं वाटप 

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,
पी.डी राहंदगळे महाविद्यालय
लेट मोहन चव्हाण वी.जे
एन.टी ज्युनिअर कॉलेज
गुरुकुल ब्राईट स्कूल
विकास हायस्कूल
स्वामी शांती प्रकाश शाळा
सुधाकर नाईक महाविद्यालय
टी.जी देशमुख प्राथमिक शाळा 
या सारख्या अनेक शाळा आणि महाविद्यालय यांची नावं यामध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची गरज शाळांना का असते?

अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांना RTE कायदा लागू होत नाही
RTE कायदा लागू नसल्याने 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचं बंधन नाही
अल्पसंख्याक शाळात शिक्षकांना TETची अट नाही
अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलत मिळते
अल्पसंख्याक शाळांना विविध कारणांसाठी कोट्यवधीचे अनुदान, देणगी देण्याची मुभा

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp