
Ajit Pawar Death In Plane Crash Triple Layer Inquiry: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघाताची कारणं काय आहेत याचा शोध सुरु आहे. या दुर्देवी अपघातामध्ये अजित पवारांबरोबरच विमानातील सर्व पाच जण मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली असून अजित पवारांसारखा जमीनीला जोडलेला नेता गमावल्याने सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. त्यातच हा अपघात होता की घातपात अशी शंका अजित पवारांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरींसहीत काही नेत्यांनी उघडपणे विचारली आहे. त्यामुळेच या अपघात प्रकरणातील गूढ वाढलं असून अनेक प्रश्न अपघाताच्या एका आठवड्यानंतरही अनुत्तरित असतानाच थ्री लेअर इन्वायरी केली जाणार आहे. मात्र ही थ्री लेअर इन्वायरी कशी केली जाणार आहे? त्यामुळे काय काय शोधलं जाणार आहे जाणून घेऊयात…
अजित पवारांच्या विमान अपघाताचा सखोल तपास केला जाणार असून तो तीन महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये केला जाणार आहे. साईट इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊन ‘ब्लॅक बॉक्स’मधील डेटा रिकव्हर करायला सुरुवात झाली आहे. आता या प्रत्येक टप्प्यामध्ये म्हणजेच लेअरमध्ये कसली चौकशी केली जाणार आहे, हे ही समोर आलं आहे.
फर्स्ट लेअर
पहिल्या लेअरमध्ये विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन केलं जाणार आहे.
नक्की वाचा >> Ajit Pawar Death: बॉडीगार्ड विदीप जाधवांचा Life Insurance मंजूर; कुटुंबाला किती रक्कम मिळणार?
सेकेंड लेअर
दुसऱ्या लेअरमध्ये विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार. यामधून विमान जमीनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे.
थर्ड लेअर
तिसऱ्या लेअरमध्ये अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाणार, अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हा तपास आणि अहवाल प्रक्रिया दिर्घकाळ चालणार हे स्पष्टच आहे.
तिन्ही स्तरावर चौकशी झाल्यानंतर पुढे काय?
“थ्री लेअर” तपासाअंती नागरी विमान महासंचनालयाचा अंतिम अहवाल सादर केला जाईल. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (AAIB) कडून विमान अपघाताच्या तपासला गती दिली जाणार आहे. तर सीआयडीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबतचा अधिक तपास सुरु आहे.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी केली जावी अशी मागणी करताना अमोल मिटकरींनी अनेक शंका उपस्थित करत सदर अपघात घातपात वाटत असल्याचा आरोप केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



