
Rohit Pawar Press Conference On Ajit Pawar Death In Plane Crash: दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधानसंदर्भात झालेला अपघात हा घातपात तर नाही अशी शंका उपस्थित करणारे कर्जत-जामखेडचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात अनेक शंका उपस्थित करताना रोहित पवारांनी प्रेझेंटेशन दिलं. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तुम्ही इतकी सारी माहिती समोर आणत आहात तुम्हाला भीती नाही का वाटतं? असा सवाल पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर बोलताना रोहित पवारांनी त्यांच्या पत्नीने व्यक्त केलेली भीती काय होती हे सांगितलं.
एवढ्या मोठ्या लोकांना अंगावर घेत असेल तर…
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना रोहित पवारांनी, “भीती मला वाटत नाही. माझ्या परिवाराला 100 टक्के भीती वाटते,” असं म्हटलं. पुढे बोलताना, “एवढ्या मोठ्या लोकांना अंगावर घेत असेल तर भीती वाटणारच. अशी घटना घडवायला फार मोठी लोक यामागे असतील किंवा लागतील. या लोकांना तू अंगावर घेत असशील तर आम्हाला तुझी काळजी वाटते हे मला माझ्या पत्नीनेसुद्धा बोलून दाखवलं आहे. माझ्या मुलांनी, आई-वडिलांनी आणि सासऱ्यांसहीत सगळ्याच जवळच्या लोकांनी बोलून दाखवलं आहे. पण आपण नाही लढणार तर कोण लढणार?” असा सवाल रोहित पवारांनी केला.
भीतीपोटी आम्ही थांबलो तर…
“हा (अजित पवारांच्या अपघाती निधनाचा) विषय या परिवारासाठी आणि महाराष्ट्रासाठी फार भावनिक आहे. भीतीपोटी आम्ही थांबलो तर आम्ही मराठी कसले आणि पवार कसले? आम्ही लढत आहोत. भीती आहे. उद्या याबाबतीत काही गोष्टींची काळजी घेतली आहे. काही कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की उद्या जाऊन कुठं तरी वेगळ्या पद्धतीने प्रोटेक्शनसंदर्भात काही करता येईल का याची चाचपणी सुरु आहे,” असं रोहित पवार म्हणाले.
नक्की वाचा >> Ajit Pawar Plane Crash: मुख्य आरोपी अमेरिकेत? त्याची माहिती भारतात इंटरनेटवरही नाही, रोहित पवारांचा दावा; ही व्यक्ती कोण?
डोकं न वापरता ट्रोलिंग
सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून होत असलेल्या ट्रोलिंगबद्दलही रोहित पवारांनी या वेळेस भाष्य केलं. “यामागे कोण आहे नाही माहिती नाही? का माझा विरोध करत आहेत हे सांगता येणार नाही. ट्रोल करत आहेत त्यामुळे शंका नक्कीच वाढत आहे. जर मोठ्या नेत्यांना माहिती नसेल त्यांचे ट्रोलर्स अशापद्धतीचे पराक्रम करत आहेत डोकं न वापरता. त्यांना आदेश गेले पाहिजे. काहीतरी फालतू गोष्टी करतात. मला म्हणतात की तू कशाला विमानाने गेला होता. मला थोडी माहिती आहे ते विमान कसं आहे. ते विमान चालवता आलं असतं तर मीच उडवत गेलो असतो ना?” असा टोला रोहित पवारांनी लगावला.
“फालतू काहीतरी विषय आहे. बिना मेंदूचे ते ट्रोलर्स आहेत,” असं म्हणत रोहित पवारांनी ट्रोलर्सला लक्ष्य केलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



