digital products downloads

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर पहिली कारवाई! AAIB ने व्हेंचर्स कंपनीत घुसून केली कारवाई, महत्त्वाची कागदपत्रं जप्त

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेनंतर पहिली कारवाई! AAIB ने व्हेंचर्स कंपनीत घुसून केली कारवाई, महत्त्वाची कागदपत्रं जप्त

AAIB Officers Raid on VRS Ventures Office: अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आता तपासाला वेग आला आहे. विमान अपघात तपास ब्युरो (Aircraft Accident Investigation Bureau) चे अधिकारी व्हीआरएस व्हेंचर्स कंपनीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. कंपनीचे मालक आणि एआयबीचे अधिकारी तब्बल दीड तासांहून अधिक काळ कंपनीच्या आत उपस्थित होते. चौकशी पूर्ण करून AAIB चे अधिकारी कंपनीबाहेर आले असून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेऊन सील करण्यात आली आहेत.  या चौकशीसाठी तीनहून अधिक अधिकारी VRS व्हेंचर्स कंपनीत पोहोचले होते.

Add Zee News as a Preferred Source

दरम्यान, VRS व्हेंचर्सचे संचालक व्ही. के. सिंह यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “पायलटला कदाचित रनवे स्पष्टपणे दिसला नसावा. पायलटकडे 16 हजार तासांचा उड्डाण अनुभव होता, तर को-पायलटकडे 1500 तासांचा अनुभव होता. विमानात कोणतीही तांत्रिक बिघाड नव्हता. 2023 मधील अपघाताच्या वेळी पाऊस सुरू होता. एअरलाईनकडे अजूनही 7 विमाने आहेत आणि ती ग्राउंड करण्याचा आमचा निर्णय नाही. DGCA आमच्या विमानांची तपासणी करत आहे.”

 

AAIB अधिकाऱ्यांच्या बाहेर पडण्यानंतर कंपनीकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, गेटवर कंपनीत प्रवेश करताना कंपनीचे कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तपास यंत्रणांची चौकशी सुरू असून या प्रकरणावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

विमानाला का म्हटलं जातं मृत्यूचं थडगं?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या खासगी विमानानं प्रवास करत होते, ते कोणतं सामान्य विमान नसून हे विमान होतं, Bombardier Learjet 45. हे एक बिझनेस जेट असून, या विमान कंपनीचा इतिहास काहीसा चिंतेत टाकणारा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जगभरात या कंपनीच्या विमानांचे आतापर्यंत 200 लहानमोठे अपघात नोंदवण्यात आले आहेत. 

चार्टर्ड विमानांच्या श्रेणीत ‘लिअरजेट’ हे एक मोठं नाव असून, या कंपनीची सुरुवात 1960 मध्ये विलियम पॉवेल लियर यांनी सुरू केली होती. आजच्या घडीला ही कंपनी कॅनडाती दिग्गज संस्था ‘बॉम्बार्डियर एअरोस्पेस’चा एक भाग आहे. या कंपनीकडून 2021 मध्येच सदरील विमानांची निर्मिती थांबवण्यात आली होती. मात्र जुनी विमानं आजही सेवेत होती आणि आहेत. अशाच एका विमानातून अजित पवार प्रवास करत होते, जो त्यांच्या जीवनातील अखेरचा प्रवास ठरला. 

Learjet 45 ची खरी ओळख काय?

Learjet 45 हे विमान त्याच्या वेगासाठी ओळखलं जातं. या विमानाचा ताशी वेग 860 किमी असून, अवघ्या 20 मिनिटांत ते 41 हजार फूट इतक्या उंचीवर पोहोचण्याची किमया करतं. एका खेपेत हे विमान 4 हजार किमीपर्यंतचा मोठा पल्ला गाठू शकतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रचंड ताकदीचं विमान अशी ओळख असणारं हेच वाहन अजित पवारांसाठी मात्र जीवघेणं ठरलं. 

अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानतून प्रवास करणाऱ्या कोणाचाही जीव वाचला नसल्याची अधिकृत माहिती यंत्रणांनी जारी केली असून, या माहितीनुसार विमानात खालील व्यक्ती प्रवास करत होते.. 

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेची चौकशीची मागणी

ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं आहे की, “अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. ही बातमी समजल्यावर मला खूप धक्का बसला आहे. देशातील लोकांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेचा काही भरवसा नाही. अजित पवारांच्या निधनाची योग्य चौकशी झाली पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे”. 

 

अजित पवार सत्ताधारी महायुतीपासून दूर जात होते असा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. “ते सत्ताधाऱ्यांसोबत होते. पण काही दिवसांपूर्वी मी एक विधान वाचलं होतं, सोशल मीडियाच्या माध्यमातून समोरील पक्षातील कोणीतरी विधान केलं होतं की, अजित पवार यांना भाजपाला सोडायचं आहे. त्यात आता जे झालं आहे त्याची योग्य चौकशी होण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी झाली पाहिजे. इतर कोणतीही यंत्रणा नको. सर्व यंत्रणा विकत घेण्यात आल्या आहेत”.

देशासाठी हे खूप मोठं नुकसान आहे. ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करणार होते. त्यांच्या कुटुंबाप्रती माझं दु:ख आणि संवेदना आहेत असंही त्यांनी म्हटलं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp