digital products downloads

अजित पवारांना अपघाताच्या आदल्या रात्री भेटायला आलेल्या नेत्याचं नाव समोर! ‘ते कारने जाणार होते पण आयत्या वेळी…’

अजित पवारांना अपघाताच्या आदल्या रात्री भेटायला आलेल्या नेत्याचं नाव समोर! ‘ते कारने जाणार होते पण आयत्या वेळी…’

Leader Who Made Ajit Pawar Wait On 27th Evening: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा 28 जानेवारी रोजी झालेला अपघात हा घातपात असल्याची शक्यता त्यांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवारांनी 10 आणि 11 तारखेला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बरेच आकडे, परिस्थितीजन्य पुरावे यासारख्या गोष्टींचा उल्लेख करत अगदी प्रेझेंटेशन सादर करुन सदर अपघात घडला की घडवून आणला अशी शंका उपस्थित केली.

Add Zee News as a Preferred Source

सदर शंका उपस्थित करतानाच रोहित पवारांनी आदल्या दिवशीचा घटनाक्रमही सांगितला. त्यामध्ये अजित पवार रस्ते मार्गेने 27 जानेवारीला पुण्याला जाणार होते. मात्र विदर्भातील एका नेत्याने त्यांना एका फाइलवर स्वाक्षरी करण्यासाठी थांबवून ठेवल्याचा दावा केला. त्यामुळे हा नेता कोण अशी चर्चा सुरु असतानाच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका नेत्यानेच त्या संध्याकाळी अजित पवारांकडे काम घेऊन कोणता नेता आलेला त्याच्या नावाचा जाहीर कार्यक्रमात थेट उल्लेख केला.

नक्की पाहा हे फोटो >> अजित पवारांना वाटत होती विषप्रयोगाची भीती? ‘ती’ सवय बदलली; याच फोटोंमधून समोर आलं सत्य

27 जानेवारीचा घटनाक्रम

अजित पवार आदल्या दिवशी कारने बारामतीत जाणार होते. ‘देवगिरी’ बंगल्याबाहेर संध्याकाळी त्यांच्या गाड्यांचा ताफा सज्ज होता, पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याने दादांना थांबायला सांगितले. ‘‘एका महत्त्वाच्या फाईलवर सही करावीच लागेल, मी पोहोचतो’’ या निरोपानंतर ते सदर नेता दोन-तीन तास उशिरा पोहोचला. त्यामुळे जास्त उशीर झाल्याने अजित पवारांनी रस्ते मार्गाने बारामतीकडे जाण्याची योजना रद्द झाली. हा पूर्व विदर्भातील नेता कोण? असा सवाल रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला. रोहित पवारांनी या नेत्याच्या नावाला उल्लेख केला नाही. मात्र अन्य एका नेत्याने याच घडामोडींच्या संदर्भातून थेट नेत्याचं नाव घेत विधान केलं आहे.

नक्की वाचा >> ‘अजित पवारांचा ‘काटा’ इस्रायलच्या…’, ठाकरे सेनेचा हल्लाबोल; ‘अजितदादांना आदल्या दिवशी रात्री…’

त्या संध्याकाळी कोणाच्या कामासाठी थांबले अजित पवार?

राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी एका शोकसभेत बोलताना रोहित पवारांनी सांगितलेल्या घटनाक्रमाशी साधर्म्य सांगणारा घटनाक्रम सांगताना या नेत्याचं नाव घेतलं आहे. “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती, परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल आले. त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांना गमावले”, असं प्रमोद हिंदुराव म्हणाले. प्रमोद हिंदुराव यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण दोन्ही वेगवेगळे दावे जोडून पाहताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करताना रोहित पवारांनी उल्लेख टाळलेला तो नेता हाच तर नव्हे ना? असा सवालही उपस्थित केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp