
Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार केला. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. झी 24 तासने हा गैरव्यहार उघडकीस आणला. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. यानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार रद्द झाल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. प्रत्यक्षात हा व्यवहार रद्द होऊ शकत नाही.
झी 24तासने उघडकीस आणलेला मुंढवा जमीन गैरव्यवहार अखेर रद्द झाल्याची घोषणा अजित पवार यांनी केली असली तरी प्रत्यक्षात यासंबंधीचे मुंद्राक शुल्क हे भरावेच लागणार. तसं पञच मुंद्राक शुल्क विभागाने दोन्ही पार्ट्यांना पाठवले आहे. सात टक्के स्टँम्प ड्युटीप्रमाणे दोन्ही बाजुंचे हे शुल्क 21 कोटी होते. पण मूळ व्यवहारावेळीचे शुल्क हे दोन्ही पार्ट्यांनी बुडवले असल्या कारणाने आता व्यवहार रद्द होताना या दोघांना शासनाकडे 21+21 अशी एकूण 42 कोटींची स्टँम्प ड्युटी भरावी लागेल नंतरचा हा व्यवहार रद्द होईल, असं जाणकारांकडून सांगितलं जात आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन व्यवहार अखेर रद्द करण्यात आला आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत ही घोषणा केली. या प्रकरणाची चौकशी करताना कोणाच्याही दबावाखाली येऊ नका असे स्पष्ट आदेश अधिका-यांना देण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलं. या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसंच नियमांना बगल देऊन कोणतीही गोष्ट केलेली नाही. यात एकाही पैशाचा व्यवहार झाला नसल्याचं, अजित पवारांनी सांगितलं.
या प्रकरणात नेमकी कोणी फसवणूक केली याची चौकशी होणार आहे. तसंच कोणाचे फोन गेले, कोणाचा दबाव होता याचीही चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. जमीन व्यवहारासाठी जे गेले होते त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचं ते म्हणाले. झी २४ तासनं कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराची बातमी उघड केली होती. या बातमीचे तीव्र राजकीय पडसाद उमटले होते. झी २४ तासनं हे प्रकरण चांगलंच लावून धरलं होतं. त्यानंतर अखेर हा जमीन व्यवहार रद्द करण्यात आला असल्याचं, अजित पवार यांनी मुंबईत जाहीर केलं.
झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन गैरव्यवहार प्रकराणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचे 99 टक्के तर दिग्वीजय फक्त 1 टक्का भागिदार आहेत.
FAQ
1 पुणे कोरेगाव पार्क जमीन व्यवहार काय आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क (किंवा मुंढवा) येथे ४० एकर जमिनीचा व्यवहार केला. हा व्यवहार ३०० कोटी रुपयांचा असून, त्यासाठी केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याचा गैरव्यवहाराचा आरोप आहे. झी २४ तासने हे प्रकरण उघडकीस आणले, ज्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली.
2 या व्यवहारात कोण-कोण सामील आहेत?
व्यवहारात पार्थ पवार (अमेडिया कंपनीत ९९% भागीदार), त्यांचे भागीदार दिग्विजय पाटील (१% भागीदार), जमीन विक्रेता शीतल तेजवानी आणि सह-दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांचा समावेश आहे. अमेडिया कंपनीच्या माध्यमातून हा व्यवहार झाला.
3 या प्रकरणात काय कारवाई झाली आहे?
झी २४ तासच्या बातमीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत तीन जणांविरोधात (शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारु) गुन्हा दाखल झाला. चौकशी सुरू असून, फसवणूक, दबाव आणि फोन कॉल्सची तपासणी होणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



