
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कर्जमाफीवरील वक्तव्यानंतर राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल त्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. “अजित पवार काही चुकीचे बोलले नाहीत, असे मला वाटते. फक्त कर्जमाफी करणे आणि नुकसानभरपाई देणे हेच सरकारचे काम नाही,” अस
.
अजित पवार यांनी नुकत्याच एका सभेत, “शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्ज फेडले पाहिजे, की नेहमीच माफ करा, फुकट द्या अशीच मागणी करणार? असा सवाल केला होता. यानंतर त्यांनी, आम्हाला निवडणुकीत जिंकायचे होते म्हणून आम्ही कर्जमाफीचे बोललो, असे विधान केले होते. या वक्तव्यानंतर विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता पाशा पटेल यांनी अजित पवारांच्या विधानाचे समर्थन केले आहे.
नेमके काय म्हणाले पाशा पटेल?
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची परभणीत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांनी त्यांना अजित पवारांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारला असता, कर्जमाफीबाबत अजित पवार काही चुकीचे बोलले असे मला वाटत नाही, असे म्हणत पाशा पटेल यांनी अजित पवारांचे एकप्रकारे समर्थन केले. सरकारचे काम फक्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणे किंवा नुकसान भरपाई देणे एवढेच आहे का? शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर कसे काढणे हेदेखील सरकारचं काम आहे. त्यामुळे आम्ही तेच काम करतोय, असेही ते म्हणाले.
पाशा पटेल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात?
दरम्यान, पाशा पटेल यांची ही प्रतिक्रिया पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कारण यापूर्वीही त्यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शेतकऱ्यांना “नुकसानीची सवय लावून घ्या,” असा सल्ला दिला होता आणि “सरकार प्रत्येक वेळी नुकसानभरपाई देऊ शकत नाही,” असे वक्तव्य करून संताप ओढवून घेतला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या समर्थनार्थ दिलेल्या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
नेमके काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार शुक्रवारी बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर बोलताना म्हणाले होते, शेतकरी कर्जमाफी वारंवार कशी मिळणार? शेतकऱ्यांनी कर्ज फुकटात मिळण्याची सवय लावून घेऊ नये. कर्जमाफीबाबत जूनला निर्णय घ्यायचे ठरलंय. तो निर्णय कसा होईल ते आम्ही एप्रिलमध्ये तुम्हाला सांगू. पण तुम्हीसुद्धा शून्य टक्के व्याजदराने पैसे दिल्यावर वेळच्या वेळी पैसे परत करण्याची सवय लावा ना.
सारखंच फुकटात, सारखंच माफ.. कसं व्हायचं? असं चालत नाही. एकदा शरद पवारांनी कर्जमाफी दिली, एकदा देवेंद्र फडणवीसांनी दिली, एकदा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आम्ही दिली, आता पुन्हा आम्हाला निवडून यायचे होते, म्हणून सांगितले आम्ही माफ करू. लोक म्हणतात तुम्ही सांगितलं होतं माफ करू, आता करा माफ, असे ते म्हणाले होते.
30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी मिळणार
प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर नागपुरात विराट मोर्चा काढला होता. त्यांच्या मोर्चानंतर राज्य सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिली होती. त्यामुळे बच्चू कडू यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
“आम्ही आमच्या जाहिरनाम्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत घोषणा दिली होती. त्या संदर्भात आम्ही मागच्या काळात एक समिती तयार करुन कर्जमाफी कशी करायची, दिर्घकालीन उपाययोजना काय करायच्या, अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता. कारण कर्जमाफी हा एक भाग आहे. पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो याचा विचार व्हावा अशाप्रकारची अपेक्षा होती. त्या दृष्टीने जे मित्राचे चेअरमेन आहेत प्रवीण परदेशी, त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली आहे”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



