digital products downloads

‘अजित पवार मागे फिरण्यास सुरुवात झालेली कारण अमित शाहांनी…’; राऊतांचा खळबळजनक दावा

‘अजित पवार मागे फिरण्यास सुरुवात झालेली कारण अमित शाहांनी…’; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut Big Claim About Ajit Pawar: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा महाविकास आघाडीकडे परतणार होते असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख करत अजित पवारांनी मागे फिरण्यास सुरुवात केली होती, असं म्हटलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

अजित पवार मागे फिरण्यास सुरुवात झालेली

अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅक बॉक्सही जळाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राऊतांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “अजित पवार यांचा अपघात संशयास्पद आहे. ते विधीमंडळाचे सदस्य आहे. अजित पवार यांच्या काही फाईल होत्या त्यामुळे ते भाजपात गेले. ती फाइल पुन्हा उघडण्यात आली. ती फाइल अमित शहा यांच्याकडे गेली. भाजपचे मंत्री बोलायला लागले तुमची फाइल बंद झाली नाही. दादांनी मागे फिरण्याचा सुरुवात केली. जरंडेश्वर साखर कारखान्याची ती फाईल होती,” असं राऊत यांनी म्हटलं. तसेच, “महाराष्ट्रात तीन महिन्यापासून दादा विरुद्ध भाजपा सुरू आहे,” असंही राऊत म्हणाले. “फाईल बंद करण्यासाठी अमित शाहांचा नकार होता,” असा दावाही राऊत यांनी केला आहे.

नक्की वाचा >> पार्थ पवारांचा पत्ता कट? NCP कडून राज्यसभेवर नरेश अरोरा? म्हणाले, ‘विविध नेत्यांचे..’

ब्लॅक बॉक्स गायब झाला याचा अर्थ…

अजित पवारांचा मृत्यू अपघात वाटत नाही असा संशय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विमान अपघातावर व्यक्त केलाय. विमानाचा ब्लॅक बॉक्स गायब झाला याचा अर्थ ‘दाल में कुछ काला है’ असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी उद्या म्हणजेच 18 फेब्रवारीला पत्रकार परिषद घेऊन ब्लॅक बॉक्स आणि विमान अपघातासंदर्भात मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं आहे.

देशात राहायचं असेल तर मोदी-मोदी बोलावं लागेल

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आज मुंबईच्या दौऱ्यावर असल्यावरूनही राऊतांनी टोला लगावला. मॅक्रॉन यांचे राजकीय पक्षांकडून लावण्यात आलेल्या बॅनर्सवरुन राऊतांनी खोचक टोला लगावला. “त्यांना स्वीकृत नगरसेवक करायचा आहे का? येड्यांच बाजार आहे. यांची येड्यांची जत्रा भरली आहे. परदेशी अध्यक्ष , येतात आणि जातात याच्या राजकीय पक्षांचा काय संबंध? मॅक्रोन यांना बोलवेल. फ्रान्समध्ये कधी यांचे पोस्टर नसेल लागेल. संपूर्ण मुंबईचा ट्रॅफिक झाले. मला कोर्टात जायचे आहे. गाडीत दाखवणार सी मॅक्रॉन युआर फोटोज,” असं राऊत म्हणाले. तसेच त्यांनी, “तापसी पन्नु यांनी सांगितले ते पाहिलं ना? देशात रहायचे असेल तर मोदी मोदी बोलायला लागेल,” असा चिमटा काढला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp