digital products downloads

अजित पवार विमान अपघात प्रकरण: 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू, सगळ्या शंका सोडवल्या जातील- CM देवेंद्र फडणवीस – Mumbai News

अजित पवार विमान अपघात प्रकरण:  13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू, सगळ्या शंका सोडवल्या जातील- CM देवेंद्र फडणवीस – Mumbai News



राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. तसेच अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरू असल्याचे फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, डिजिटल रेकॉर्ड घेतला आहे. डेटा उपलब्ध होणार नाही, अशी काही बाब नाही. व्हाईस रेकॉर्ड झालेला डेटा रिकव्हर केले जात आहेत. व्हीएसआर कंपनीचे ऑडिट केले जात आहे. केवळ अपघात वेळीच नाही सर्वच वर्षाच ऑडिट केले जाणार आहे. लॉगबुक पासून सगळ्या बाजू तपासल्या जातील. ज्या काही शंका आहे त्या सोडवल्या जातील. केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपवण्यासारखं काहीच नाही. या चौकशीतून जे काही समोर येईल ते आम्हाला देखील महत्वाचं आहे. तसेच अजित पवारांचा अपघात झाला त्या विमानातून मी स्वतः 4-5 वेळा प्रवास केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. व्हीएसआर कंपनीसंदर्भात विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, व्हीएसआर ही कंपनी स्वतः विमाने बनवत नाही, तर ती एक ‘एजंट’ किंवा ‘ऑपरेटर’ आहे. अनेक खाजगी व्यक्ती आपली विमाने अशा ऑपरेटरकडे देखभालीसाठी आणि कमर्शियल वापरासाठी (परमिटवर) देतात. याच संदर्भात बोलताना त्यांनी नमूद केले की, ज्या विमानातून दादांचा प्रवास झाला, त्या विशिष्ट कंपनीच्या किंवा ऑपरेटरच्या विमानातून मी स्वतःदेखील 4 ते 5 वेळा प्रवास केला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे मोजकेच (5 ते 7) ऑपरेटर्स आहेत. जेव्हा सरकारला विमानाची गरज असते, तेव्हा रोटेशन पद्धतीने किंवा उपलब्धतेनुसार यापैकीच एका ऑपरेटरचे विमान येते. गेल्या काही काळात व्हीएसआर हा मोठा ऑपरेटर ठरल्याने त्यांची विमाने वारंवार वापरली जातात. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून (23 फेब्रुवारी) सुरुवात होत असून, त्या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प स्वतः देवेंद्र फडणवीस सादर करणार असून, या दुःखद घटनेच्या सावटाखाली सुरू होणाऱ्या या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp